पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

या पुरस्कारामुळे मनापासून आनंद झाला आहे आणि भूतानचे महामहीम राजे यांचे आभार मानतो: पंतप्रधान

नवी दिल्ली,१७ डिसेंबर/प्रतिनिधी:-भूतानच्या  राष्ट्रीय दिनानिमित्त भूतानचे राजे महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो ‘ या  त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मोदी यांनी या पुरस्काराबद्दल  भूतानचे महामहिम राजे यांचे आभार मानले आहेत.

भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विटच्या मालिकेत म्हटले आहे;

“धन्यवाद, लिओनच्छेन  @PMBhutan!  या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे  आणि भूतानचे  महामहीम  राजे यांचे मी आभार मानतो.

आमच्या भूतानच्या बंधू-भगिनींकडून खूप प्रेम आणि स्नेह  मिळाला आहे आणि भूतानच्या राष्ट्रीय दिनाच्या शुभ प्रसंगी त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. 

शाश्वत विकासाचे अनोखे मॉडेल आणि सखोल आध्यात्मिक जीवन पद्धतीबद्दल मी भूतानचे कौतुक  करतो. त्यांचे महामहिम राजे- ड्रुक ग्याल्पोस यांनी भूतानला एक विशेष  ओळख मिळवून दिली आहे, आणि आपल्या  शेजारी देशांमधील मैत्रीचे विशेष बंध जोपासले आहेत .

भारत नेहमीच भूतानला  सर्वात जवळचा मित्र आणि शेजारी मानतो  आणि आम्ही भूतानच्या विकासाच्या प्रवासाला शक्य त्या सर्व मार्गाने पाठिंबा देत राहू.”