सी. एस. एम. एस. एस.कृषि महाविद्यालयातील १११५ विद्यार्थ्यांची निवड

Displaying AGRI LOGO (2).JPG

मराठवाड्यातील शेतकरी व कृषि क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांकरिता
2006 मध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे
यांच्या दूरदृष्टीमधून कृषि महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि अल्प
कालावधीतच हे महाविद्यालय सर्वांच्या अपेक्षेवर खरे उतरत कृषी शिक्षणात उत्तुंग गरुडझेप घेतली आहे. कृषि शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी आणि सांघिक खेळ, रोजगार अशी सर्वांगीण गुणवत्ता या महाविद्यालयाने जपली आहे.
कृषि क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार सक्षम , कौशल्यनिपुण बनविणे तसेच
विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी या महाविद्यालयात रोजगार तथा
समुपदेशन कक्षाची तसेच स्पर्धा परीक्षा मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे.  रोजगार व
समुपदेशन कक्षाद्वारे विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षण
शिबिरे, शेती आधारित उद्योग, प्रगतिशील शेतकरी तथा संशोधन केंद्रांना शैक्षणिक भेटी तसेच
विविध रोजगार मेळावे आयोजित करणे  आदी उपक्रम राबविले जातात, तसेच विविध
ऑनलाइन पद्धतीद्वारे विविध क्षेत्रातील रोजगाराभिमुख जाहिराती, माहिती पुस्तिका आदि
माहितींचे संकलन करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. स्पर्धा परीक्षा मंचाद्वारे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करिता लागणारे सर्व अद्यावत पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्धकरून देने, महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा परिक्षाचे आयोजन करणे, तसेच यशस्वी विधार्थ्यांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. याची फलश्रुती म्हणजे या महाविद्यालयामधून आज पर्यन्त १११५ विद्यार्थी पदवीधर होऊन विविध
क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचा मान सन्मान वाढवीत आहेत. 
विशेष बाब म्हणजे या महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीधर तुकडीतील विद्यार्थी श्री. सणीदेव इंद्रदेव चौधरी त्याची पहिल्या प्रयत्नात भारतीय प्रशासन सेवेमध्ये परिक्षेत्र वन अधिकारी या पदावर निवड झाली तर याच तुकडीचे १३ विद्यार्थ्यांची कृषि सहाय्यक पदावर निवड झालेली आहे. या महाविद्यालयाचे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. तसेच ९४ विद्यार्थी विविध राष्ट्रीयीकृत बँकामध्ये तर ८० पेक्षाअधिक विद्यार्थी खाजगी बँकामध्ये सेवा देत आहेत. या महाविद्यालयाचे ३८४ विद्यार्थी खाजगी क्षेत्रातील नामांकित विविध बियाणे, खते, कृषि रसायने तथा अवजारे कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

या महाविद्यालयाचे ९० विद्यार्थी कृषि पदव्युत्तर पदवी शिक्षणाकरिता घेण्यात
येणारी सामायिक परीक्षा तर १५ विद्यार्थी आचार्य सामायिक परीक्षा उत्तीर्ण करून कृषि
संशोधन क्षेत्रामध्ये देखील महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढवीत आहेत. रोजगार व
समुपदेशन कक्षाची उल्लेखनीय बाब म्हणजे ६० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रगतिशील तथा
आधुनिक शेती करीत असून १० पेक्षा अधिक विद्यार्थ्याना विविध नामांकित संस्थांनी त्यांच्या
शेती क्षेत्रातील योगदानाकरिता विविध पुरस्कार देऊन गौरोविले आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांना
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय शेळके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.