‘परमवीर स्मृती गॅलरी’ राष्ट्रभक्ती व देशसेवेसाठी नागरिकांना प्रेरणादायी ठरेल – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

परमवीर गॅलरी उभारणारे देशातील औरंगाबाद हे पहिले विमानतळ

औरंगाबाद, १६ डिसेंबर/प्रतिनिधी:- औरंगाबाद विमानतळ आवारात उभारण्यात आलेली ‘परमवीर चक्र स्मृती गॅलरी’ देशसेवेसाठी बलीदान दिलेल्या वीर शहिदांच्या जीवन प्रवासाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांच्या मनात राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माणासाठी ही गेलरी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

            विमानतळ आवारात उभारण्यात आलेल्या ‘परमवीर स्मृती गॅलरीच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण व मातृभूमी संस्थेच्या माध्यमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम अंतर्गत स्मृती गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले.

Displaying _DSC3931.JPG

            या कार्यक्रमास निवृत्त कर्नल समीर राऊत, केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी पवन कुमार, मानव विकास मिशनचे माजी आयुक्त भास्कर मुंडे,विमानतळ संचालक डी.जी.साळवे, मातृभूमी संस्थेचे अध्यक्ष जसंवत सिंग राजपूत, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर याबरोबरच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Displaying _DSC3936.JPG

            भारत देशातील पहिली परमवीर स्मृती गॅलरी औरंगाबाद येथे विमानतळ आवारात उभारली गेली असून औरंगाबादची पर्यटन क्षेत्रातील ओळख आहेच, पण या गॅलरीच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम आणि वीर जवानांच्या बलिदानाची माहिती इतर राज्यात व देशात पोहचविण्यास मदत होणार आहे. या गॅलरीत एकूण 21 परमवीर चक्र सन्मानित वीरांची माहिती असून  ती नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.

Displaying _DSC3963.JPG

            कार्यक्रमात कर्नल समीर राऊत व जसवंत सिंग राजपूत यांनी कारगील युद्ध प्रसंगातील काही आठवणींना उजाळा दिला. तसेच शहिद बिपिन रावत यांच्यासमवेत काम करताना  देशसेवेसाठी केलेल्या योगदानाची आठवणीच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. सैन्यदलात नातेसंबंधाला महत्त्व नसून निस्सीम राष्ट्रप्रेम महत्त्वाचे असते. असं सांगून प्रत्येकांनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या क्षेत्रातील आपले योगदान सर्वोच्च पातळवरीचे द्यावे. ही एक प्रकारची देशसेवाच आहे. अशा शब्दात केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी पवनकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            श्री. भास्कर मुंढे म्हणाले की, राष्ट्रभक्तीची प्रेरणा वृद्धींगत करण्यासाठी परमवीर स्मृती गॅलरी विमानतळावर येणाऱ्या प्रवांशी नागरिकांना साह्यभूत ठरेल.  सैन्यदलातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात शुद्ध राष्ट्रप्रेमाची भावना असते. ते साधे व सरळ जीवन पद्धतीत ते देशसेवा करीत असतात. म्हणून समाजातील प्रत्येकांनी प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करावा, हे त्याच्या राष्ट्रसेवेच्या कार्याला हातभार लावणारे असते.  सैन्य सीमेवर लढते व देशाचे रक्षण करते. समाजाने त्यांच्या कुटुंबियाच्या मदतीसाठी माणुसकी व देशसेवेच्या भावनेतून मदत करावी. असे आवाहन ही यावेळी उपस्थितांना  केले.