पंतप्रधान गंगा आरतीला राहिले उपस्थित, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची घेतली बैठक आणि काशीमधील प्रमुख विकास प्रकल्पांची केली पाहणी

वाराणशी ,१४ डिसेंबर/प्रतिनिधी :- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथ धामचे  उद्घाटन केल्यानंतर, त्यांनी पूजा केली आणि गंगेत पवित्र स्नान केले.  त्यानंतर सोमवारी  संध्याकाळी पंतप्रधान गंगा आरतीला उपस्थित राहिले. 

Image

गंगा आरती नेहमीच नव्या उर्जेने भारुन टाकते असे ट्विट त्यांनी गंगा आरतीबाबत केले. ते म्हणाले “काशीची गंगा आरती नेहमीच अंतर्मन नव्या  उर्जेने भारुन टाकते. आज काशीचे मोठे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी झालो आणि गंगामातेस कृपा करावी यासाठी नमन केले. नमामि गंगे तव पाद पंकजम्।“

त्यानंतर पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विस्तृत बैठक घेतली.

पंतप्रधानांनी ट्विट केले की, “काशी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत विस्तृत बैठक नुकतीच संपली.”

पंतप्रधानांनी काशीतील महत्त्वाच्या विकासकामांचीही पाहणी केली. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“काशीतील प्रमुख विकास कामांची पाहणी. या पवित्र शहरासाठी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

पंतप्रधान रेल्वे स्थानकावरही गेले. ते म्हणाले “पुढिल थांबा..  बनारस स्थानक. आम्ही रेल्वे संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यासाठी तसेच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानके सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत. “

लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी नेहेमी प्रमाणेच रात्री उशिरा विकास प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी जनतेने प्रचंड उत्साह दाखवला, हे सारे त्यांचे (त्यांचे खासदार)  पंतप्रधानांप्रती असलेले प्रेमच दर्शवते.