नोटरी वकील व्यावसायिकांचे कामकाज बंद आंदोलन

औरंगाबाद,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- नवीन  नोटरी सुधारणा बिलाविरोधात मंगळवारी दि.१४ महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व नोटरी वकील व्यावसायिकांनी एक दिवसीय कामकाज बंद आंदोलन केले. शिवाय नविन नोटरी सुधार बिलाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना  निवदेनही दिले.

केंद्रशासनाच्‍या न्‍यायविभागाने नवीन  नोटरी सुधाराणा बिलात, वकीलांना १५ वर्षांपर्यंतच नोटरी प्रमाणपत्र देण्‍यात येईल, त्‍यानंतर त्‍या वकीलाला नोटरीचे काम करता येणार नाही आणि तसे प्रमाणपत्र देखील देता येणार नसल्याचे नमुद करण्‍यात आले आहे. या नवीन नोटरी बिलाला औरंगाबादेतील वकीलांनी विरोध दर्शविला आहे. औरंगाबादेत सुमारे २०० ते २५० वकील आहेत, जे नोटरीचे कामकाज करतात. नोटरीवरच त्‍यांच्‍या कुटूंबाची उपजिवीका चालते. नोटरी शिवाया त्‍यांचे दुसरे उत्‍पन्नाचे साधन नाही. नविन नोटरी बिल लागु झाल्यास त्‍यांना उपासमारिची वेळ येईल. या उलट ज्यांना १५ वर्षांपासून नोटरी करण्‍याचा अनुभव आहे, ते व्‍यवस्‍थीतपणे प्रत्‍येक कागद नोटराईज्ड करण्‍याचा अनुभव असतो. नोटरी कायद्याच्‍या कलम ५ मध्‍ये जी सुधारणा एकतर्फी करण्‍याचा निर्णय हा अन्‍याय कारक आहे. अशा प्रकारचे निवेदन नोटरी असोसिएशनच्‍या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना  देण्‍यात आले.  

यावेळी नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे प्रदेश प्रवक्ता शंकरराव एन. वानखेडे,  शंकरराव एन. वानखेडे, निलेश ललवानी,  अंकुश जाधव, विनायक पंडित, लक्ष्मण गायकवाड, विलास धामणे,  मंजूषा अन्नदाते, प्रमोद सोनवणे,  सुनिता राजेजाधव, विनोद बगाडीया, रावसाहेब गायके, आर. एम. सोनवणे,संगिता हिवराळे,  एन. जे. काळे,  भगवान चव्हाण, सिंधू जेठे, शिषीर दहीवाळ, सुलभा परदेशी, पटेल आदींची उपस्थिती होती.