वनस्टॉप सेंटर’सखी’साठी घाटी रुग्णालयात जागा उपलब्ध करुन देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१४ डिसेंबर/प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या (सखी) One Stop Crises Center या योजनेअंतर्गत तात्पुरता निवारा, आरोग्य तसेच इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  घाटी रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती सखी सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

Displaying _DSC3847.JPG

यावेळी याबैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद एंडोले,(सखी) वन स्टॉप सेंटर या योजनेच्या व्यवस्थापकीय समिती सदस्य ॲड. अनिता शिवूरकर, अर्चना पाटील, डॉ.रेखा भंडारे, ॲड.वैजनाथ काळे यांची उपस्थिती होती.

            सखी केंद्राअंतर्गत संकटग्रस्त महिला व मुलींना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येते. यासाठी दैनंदिन कामकाजाकरिता कंत्राटी पद्धतीने पदभरतीस मुदतवाढ व नियुक्ती संदर्भात अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी या व्यवस्थापकीय समितीच्या कामकाजाचा व  विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकरी यांनी घेतला. केंद्र शासनाच्या नवीन सुधारीत निकषानुसार One Stop Crises Center पीडित महिला वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील. म्हणून संबंधित जिल्ह्याच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील किमान 300 चौ.मी. इतकी सुयोग्य जागा निवडून त्यावर इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे. अशी तरतूद शासन निर्णयात  नमूद असल्याने याची अंमजबजावणी म्हणून घाटी रुग्णालय परिसरात वन स्टॉप सेंटरसाठी जागा उपलब्ध करुन महिला व मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्धतेसाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी कामकाज पाहतील. असे यावेळी त्यांनी सांगितले.  तसेच सदरील केंद्रास 181 या हेल्पलाईन आणि इतर कार्यान्वित असलेली हेल्पलाईन जोडण्यात येतील, असेही चव्हाण म्हणाले.