राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित लाईव्ह सभेला वैजापूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Displaying IMG-20211212-WA0136.jpg

वैजापूर,१२ डिसेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, देशाचे माजी संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीला (लाईव्ह सभा) वैजापूर येथे रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Displaying IMG-20211212-WA0127.jpg


वैजापूर पंचायत समितीच्या कै. विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या लाईव्ह सभेपूर्वी माजी आमदार  भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, प्रशांत शिंदे यांची समयोचित भाषणे झाली. या लाईव्ह सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, बाजार समितीचे सभापती भागीनाथराव मगर, साईनाथ मतसागर, मंजाहरी पाटील गाढे, चंद्रशेखर साखरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.