वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 282 प्रकरणात 1 कोटी 48 लाखांची तडजोड

वैजापूर,१२ डिसेंबर /प्रतिनिधी :-तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.11) येथे आयोजित लोक अदालत मध्ये भूसंपादन मोबदला व अन्य प्रकरणांत मिळून 1 कोटी 48 लाख 32 हजार 571 तडजोड करण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित या राष्ट्रीय लोक अदालत चे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहोयोद्दीन व न्यायाधीश पी.पी.मुळे यांच्याहस्ते झाले.न्या.डी.एम.आहेर, न्या.आर.एन.मर्क, न्या.श्रीमती पी.टी. शेजवळ, न्या.श्रीमती पी.आर.दांडेकर, न्या.युनूस तांबोळी, न्या.सचिन शिंदे, न्या.एस.एच.निचळ व वकील संघाचे अध्यक्ष आर.एस. हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती. या लोकअदालत मध्ये एकूण 2 हजार 16 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 282 प्रकरणात तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आली. झालेल्या तडजोडीत नांदूर-मधमेश्वर कालवा विभागांतर्गत भूसंपादन मोबदला व अन्य प्रकरणे मिळून 1 कोटी 48 लाख 32 हजार 751 रुपयांची तडजोड करण्यात आली.या लोकअदालत प्रसंगी वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे, सचिव  एस.एच.अली, नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाचे वकील संतोष मेने तसेच भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.