राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नागरिकांचा उत्सफूर्त सहभाग,2191 प्रकरण तडजोड व सामंजस्याने निकाली

लोकअदालतीत १० संसार पुन्‍हा जुळले

औरंगाबाद,११ डिसेंबर /प्रतिनिधी:- आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२७६ प्रलंबीत व ९१५ दाखलपूर्व असे एकुण २ हजार १९१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये २७ कोटी ०९ लाख ३८ हजार ०७६ व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकुण ०३ कोटी १९ लाख २१ हजार ८४७ रुपये इतकी वसुली झाली. एकूण ३० कोटी २८ लाख ५९ हजार ९२३ एवढ्या असलेली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटली.

सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, विद्युत चोरीची, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये हिंदुजा लेलॅड फायनान्स, उज्वला स्मॉल फायनान्स बँक, गोदावरी मल्टीस्टेट फायनान्स, भारत संचार निगम लि. बजाज ॲटो फायनान्स आणि बजाज फायनान्स लि.( सर्व शाखा ) ट्रफिक ई-चालनाची आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे, टाटा मोटार फायनान्स, जॉन डियर फायनान्स, टि.व्ही.एस. क्रेडीट फायनान्स, आय.सी.आय.सी.आय बॅक, एच.डी. एफ.सी.बँक, जना स्मॉल फायनान्स (सर्व शाखा), युनियन बॅक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक (सर्व शाखा) यांची वादपूर्व प्रकरणे (सर्व शाखा) मध्यस्थी केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली.

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद व जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद येथे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन श्री.श्रीपाद द.टेकाळे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव श्री.जयेश आंबोडकर हे उपस्थित होते.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यसाठी निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून , यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आलेले होते. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासले जात होते ,तसेच प्रत्येक ठिकाणी सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात आली होती.न्यायालय परीसरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दिवसभर देण्यात येत होत्या. यात पॅनलची बैठक व्यवस्था सर्व नियमांचे पालन करुन करण्यात आली होती.

लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी मा.श्री.श्रीपाद द.टेकाळे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे अधिकारी, वित्तीय संस्था, वकील व बॅकेचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. लोकअदालतीच्या तयारीसाठी मा.श्री.श्रीपाद द.टेकाळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.कलोती, जिल्हा न्यायाधीश-1श्रीमती एस.एस.भिष्मा, जिल्हा न्यायधीश-2श्रीमती टी.जी.मिटकरी, जिल्हा न्यायाधीश-4 श्री.एस.के.कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-6, श्री.एस.एस.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-7,श्री.एम.एस.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-11, श्री.ए.ए.कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-14, श्री.पी.आर.शिंदे, दिवणी न्यायाधीश, व स्तर,श्री.एस.डी.कु-हेकर, मुख्य न्यायदंडधिकारी व श्री.जयेश आंबोडकर, न्यायाधीश तथा प्रभारी सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांनी सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, भूसंपादन अधिकारी, भूसंपादन संस्थेचे अधिकारी, मोबाईल कंपनीचे अधिकारी इत्यादी सोबत बैठका घेतल्या. सदर बैठकामध्ये सर्व प्रलंबित प्रकरणाचे संबंधीत घटकांना लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.


 दुभंगलेले  १० संसार पुन्‍हा जुळले

क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास, अशा काही कारणांमुळे दुभंगलेले ३२ पैकी १० संसार शनिवारी दि.११ डिसेंबर रोजी पुन्हा जुळले. ही प्रकरणे कौटुंबीक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.

न्यायालयात एकूण ३२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात दोन्ही बाजूची २० जोडपी हजर राहिली. त्‍यापैकी १८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील १० प्रकरणांत समेट झाला असून असून दुभंगलेले संसार पुन्हा जुळवण्याच्या दृष्टीने मार्ग निघाला. आठ प्रकरणांमध्‍ये तडजोडीने निकाली निघाली. तर १२ प्रकरणांमध्‍ये पक्षकार गैरहजर राहिले.राष्ट्रीय लोक अदालत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आय.जे. नंदा आणि न्‍यायाधीश आशिष अयातिच यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कौटूंबिक न्‍यायालयाच्‍या पॅनलवर निवृत्त न्‍यायाधीश दिलीप खोत यांची पॅनल प्रमुख म्हणुन तर विधिज्ञ माधुरी अदवंत व समपुदेशक मनिषा कांदे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोक अदालतसाठी प्रभारी प्रबंधक एस.आर. दाणी, अधिक्षक कल्याण पागिरे आणि कौटुंबिक न्‍यायालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.