औरंगाबाद शहराला 20 एमएलडी अधिक पाणी देण्याचे नियोजन

औरंगाबादच्या विकासालाच शासनाचे प्रथम प्राधान्य : पालकमंत्री सुभाष देसाई

संत ज्ञानेश्वर उद्यान,  वेरूळ-घृष्णेश्वर येथे मूळ बांधकामाशी साधर्म्य असणारे 1000 व्यक्ती क्षमतेचे व 177 गाळे असणारे व्यापारी संकुल

औरंगाबाद,१० डिसेंबर /प्रतिनिधी:-औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : महाराष्ट्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मागील दोन वर्षात राज्याने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही, असा संदेश देत औरंगाबादच्या विविध विकासकामांना शासनाने गती देऊन ते पूर्णत्वास नेले आहेत. प्राधान्य देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सांगितले.

            शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री देसाई म्हणाले, एमसीइडीमध्ये वस्तीगृह विस्तारीकरण केले आहे. यामध्ये आता 300 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण मिळणार आहे. 100 निवासी प्रशिक्षणार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतात, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात असलेल्या ऑरिक सिटीमध्येही विविध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्यासह औरंगाबादेत कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वेग वाढलेला आहे. ऑरिकमध्ये रिक्त सभागृह कंपन्यांसाठी देऊ केले आहेत. एकूणच उद्योग क्षेत्राला आवश्यक व पूरक वातावरण औरंगाबादेत निर्माण करण्यात आलेले आहे. शिवाय दळण वळणाचा विचार करताना औरंगाबाद – नगर लोहमार्ग यासाठी पाठपुरावा सुरू असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत कामही सुरू केलेले आहे. त्याचबरोबर औरंगाबादहून पर्यटक, भाविकांना शिर्डी अधिक जवळ व्हावे यासाठीही राज्याच्या उपराजधानी आणि राजधानीला जोडणारा हिंदूऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याचा (समृद्धी महामार्ग) काही भाग मिळून ए.एस.क्लब माळीवाडा मार्गे शिर्डी रस्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाणार आहे. शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या  समृद्धी महामार्गातील नागपूर-‍शिर्डी रस्त्याचेही लवकरच लोकार्पण होणार आहे.

            शासनाने दक्षीण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत संतपीठाची सुरूवात केली आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान,  वेरूळ-घृष्णेश्वर येथे मूळ बांधकामाशी साधर्म्य असणारे 1000 व्यक्ती क्षमतेचे व 177 गाळे असणारे व्यापारी संकुल प्रस्तावीत करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून दिला आहे. तर क्रीडा क्षेत्राचा विचार करताना विभागीय क्रीडा संकुलासाठी सात कोटी रुपयांच्या निधीची भर घातलेली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा सुसज्ज, अद्यावत केलेल्या आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या पूर्ण होईल. उर्वरीत दोन डोस पूर्ण घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. आरोग्याबरोबरच शहरासह जिल्ह्यातील सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यानुसार कामेही प्रगतीपथवर आहेत. ग्रामीण भागात हर घर नल आणि प्रती मानसी 55 लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत.  औरंगाबाद शहराला 20 एमएलडी  अधिक पाणी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

            मिळकत करामध्येही चांगल्या प्रमाणात वसुली करण्यात आलेली आहे. शासनाने गुंठेवारीबाबतचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर मिटमिटा येथे सफारी पार्कसाठी 40 हेक्टर जमीन हस्तांरित करण्यात आली आहे. उर्वरीत 20 हेक्टर जमीनही लवकरच संपादित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. शहराचा सांस्कृतिक वारसा जोपसण्‌यासाठी आवश्यक असणारे संत एकनाथ रंग मंदिर अतिशय सुंदर व सुसज्ज जानेवारीमध्ये रंग मंदिर सुरू होणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

इतर महत्त्वाचे मुद्दे

·         स्वर्गीय मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन – उभारणे  काम प्रगतीपथावर आहे.

·         क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणे – पुतळ्याची उंची 21 फुट, रुपये 3.53 कोटी मंजुर

·         औरंगाबाद सफारी पार्क- डीपीआर 147 रु. कोटी (20% अधिक काम पूर्ण)

·         औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना रु.1680 कोटी – काम प्रगतीपथावर

·         MELTRON Hospital- 345 खाटांचे सुसज्ज रुग्णालय

·         महाराष्ट्र गुंठेवारी विकास- अधिनियम 2001 निकषातील बदल

·         घनकचरा व्यवस्थापन –मंजूर निधी रु.148 कोटी असून यामध्ये आतापर्यत केंद्र व राज्य शासनाच्या अुनदानापैकी रु.72 कोटी महानगरपालिकेस प्राप्त

·         शासन अनुदनित रस्ते प्रकल्प – रु.99 कोटी अंतर्गत 30  रस्त्यांची कामे एकूण 35.98 कि.मी, रु 152.38 कोटी अंतर्गत 23 रस्त्यांची कामे एकूण 25.38 कि.मी.

·         माझी स्मार्ट बस- 236 कोटी रुपये – दररोज 12000 लोकांना त्यांच्या दैनंदिन सहलींचा लाभ, शहरातील वाहतूक मोडचे सर्वांत कमी भाडे असल्याचे सिध्द होते.

·         मास्टर सिस्टम इंटिग्रेटर (MSI)- आयटी कनेक्टीव्हीटी आणि डिजिटलकरण – 178 कोटी रुपये, शहरातील वाहतूक प्रवाहाचे निरीक्षण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सक्षम गुन्हे शेधण्यात पोलिसांना मदत

·         संत एकनाथ रंग मंदिराचे नुतनीकरण करणे- अंदाजित रक्कम 7.81 केाटी रुपये-  काम पूण -95 टक्के

·         माझी वसुंधरा-  खाम नदीचे पुनर्वसन आणि हरित क्षेत्र सुधारणे

·         ऐतिहासिक दरवाज्यांचे संवर्धन-  4 कोटी रुपये