औरंगाबादच्या धोरणात्मक विकासाला प्राधान्य: रणजित कक्कड

औरंगाबाद फर्स्टच्या अध्यक्षपदी रणजित कक्कड, उपाध्यक्षपदी मुकुंद कुलकर्णी, सचिवपदी डॉ. सुनील देशपांडे

औरंगाबाद,१० डिसेंबर /प्रतिनिधी:-

माझ्या अगोदर माझे शहर हे ब्रीदवाक्य औरंगाबाद फर्स्टचे काम चालते. त्यानुसार पर्यावरण, पर्यटन, क्रीडा आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थांकडे पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे मत औरंगाबाद फर्स्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजित कक्कड यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद फर्स्ट २०२१-२२ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रणजित कक्कड, उपाध्यक्षपदी मुकुंद कुलकर्णी, सचिवपदी डॉ. सुनील देशपांडे, सहसचिव सुनील चौधरी, कोषाध्यक्ष अनिल माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Displaying 2.jpg

श्री. कक्कड यांनी सांगितले की, औरंगाबाद फर्स्ट या अग्रणी संस्थेचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असून जबाबदारी आहे. यापूर्वी उद्योजक ऋषी बागला, राम भोगले, मानसिंग पवार, प्रितीश चॅटर्जी, बी.एस. खोसे यांसारख्या व्यक्तींनी औरंगाबाद फस्टचे नाव एका उंचीवर नेले आहे. आता अध्यक्षपदाची धुरा सांभाळतांना निश्चितच या पदाला साजेशे काम करण्याचे उद्दिष्ट राहील.

२०२१-२२ करिता औरंगाबाद फर्स्टच्या अंतर्गत समिती प्रमुख व सदस्यांचीही निवड करण्यात आली. यात रवि चौधरी (पर्यावरण समिती),  उमेश दाशरथी (रस्ते आणि पायाभूत सुविधा), राजेश चंचलाणी (वाहतूक आणि रस्ते सुरक्षा), कमल पहाडे (वाळूज चॅप्टर), राम भोगले, अभिजीत हिरप (मीडिया), प्रितीश चॅटर्जी (सदस्य नोंदणी), निखिल भालेराव (वेबसाईट आणि सोशल मीडिया), नाना आगलावे (क्लिन अँड ग्रिन, चिकलठाणा), विवेक भोसले (सिटीजन्स चार्टर), नितीन घोरपडे (क्रिडा) सुनिल चौधरी (पर्यटन) आणि डॉ. उत्तम काळवणे (ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य) यांचा समावेश आहे, अशी माहिती कार्यकरी सचिव हेमंत लांडगे यांनी दिली.