कोविड -19 रुग्ण बरे होण्याचा दर झपाट्याने 60 टक्क्यांचा टप्पा गाठणार

बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 1,32,912

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,32,912 हून अधिक आहेत.

कोविड -19 रुग्णांच्या वेळेवरील रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज 10,000 हून जास्त रुग्ण बरे होत आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 11,881 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,59,859 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 59.52% इतका झाला आहे.

सध्या 2,26,947 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड -19 मधून पूर्णपणे बरे झालेल्यांच्या आकडेवारीनुसार अव्वल 15 राज्ये:

अनुक्रमांकराज्य/केंद्रशासित प्रदेशपूर्ण बरे झालेले
1महाराष्ट्र93,154
2दिल्ली59,992
3तामिळनाडू52,926
4गुजरात24,030
5उत्तर प्रदेश16,629
6राजस्थान14,574
7पश्चिम बंगाल12,528
8मध्य प्रदेश10,655
9हरियाणा10,499
10तेलंगण8,082
11कर्नाटक8,063
12बिहार7,946
13आंध्र प्रदेश6,988
14आसाम5,851
15ओदिशा5,353

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणानुसार अव्वल 15 राज्ये:

अनुक्रमांकराज्य/केंद्रशासित प्रदेशरुग्ण बरे होण्याचा दर
1चंदिगढ82.3%
2मेघालय80.8%
3राजस्थान79.6%
4उत्तराखंड78.6%
5छत्तीसगढ78.3%
6त्रिपुरा78.3%
7बिहार77.5%
8मिझोरम76.9%
9मध्य प्रदेश76.9%
10झारखंड76.6%
11ओदिशा73.2%
12गुजरात72.3%
13हरियाणा70.3%
14लडाख70.1%
15उत्तर प्रदेश69.1%

“चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरणानुसार, दररोज चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये सातत्याने वाढ झाली असून आजपर्यंत 90 लाखाहून अधिक नमुने तपासले गेले आहेत. गेल्या 24 तासांत 2,29,588 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या, 90,56,173 आहे.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 768 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 297 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1065 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 578 (शासकीय: 366 + खाजगी: 212)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 398 (शासकीय: 370 + खाजगी: 28)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 89 (शासकीय: 32 + खाजगी: 57)

इतरअपडेट्स:

  • देशात कोविड -19  चाचण्या घेण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या लवकरच एक कोटींचा टप्पा गाठेल. केंद्र सरकारकडून सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड -19.साठी चाचण्या वाढवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जलद गतीने विस्तारत असलेल्या निदान चाचणी नेटवर्कद्वारे आतापर्यंत  90,56,173 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात आता सार्वजनिक क्षेत्रात  768 आणि  297 खाजगी अशा एकूण 1065 प्रयोगशाळा आहेत.रोजची चाचणी क्षमता देखील वेगाने वाढत आहे. काल, कोविड -19 साठी तब्बल 2,29,588 जणांची चाचणी झाली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण उपायाद्वारे कोविड-19 चाचणी केवळ सरकारी डॉक्टरांच्या  नाही तर आता कोणत्याही नोंदणीकृत प्रॅक्टिशनरच्या शिफारशीनुसार  करता येईल, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोविड  चाचणीची शिफारस लिहून देण्यासंबंधी खासगी डॉक्टरांसह  सर्व पात्र वैद्यकीय डॉक्टरांना सक्षम करून लवकरात लवकर चाचणी पार पाडण्यासाठी सुलभ करण्यासाठी त्वरित पावले उचलावी, असा सल्ला केंद्राने राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
  • चाचण्यांमधील सर्व अडथळे दूर करण्याच्या हेतूने, केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ बलराम भार्गव, यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, चाचण्यांची व्यवस्था व वेग वाढवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली आहे. कोविड-19च्या रुग्णांचा त्वरित  शोध व प्रतिबंधन यासाठी, ‘चाचण्या-माग-उपचार’ ही त्रिसूत्री सर्वात प्रभावी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चाचणी प्रयोगशाळांच्या, विशेषतः खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या वापराची क्षमता, अत्यंत कमी आहे, याची नोंद घेत, अशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 च्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *