शिवसेनेत प्रवेश करण्याचा पर्व सुरू -पालकमंत्री सुभाष देसाई

विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद,९ डिसेंबर /प्रतिनिधी:- शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे.सिडकोतील रहिवाशांना त्यांच्या घराचा हक्क देण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचं पर्व सुरू झाले असल्याचे देखील सुभाष देसाई म्हणाले. शिवसेना संपर्क कार्यालय, क्रांती चौक या ठिकाणी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज गुरुवार जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच याप्रसंगी तालुकाप्रमुख राजू वरकड, केतन काजे ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय निकम, विधानसभा संघटक राजू वैद्य, गणेश अधाने, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, संपर्क संघटक सुनिता आऊलवार , सहसंपर्क संघटक सुनिता देव, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड ,अशोक शिंदे, कृष्णा पाटील डोणगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक करताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात व शहरी भागात विकासाच्या माध्यमातून शिवसेना जनतेपर्यंत पोहचत आहे.यामुळे जिल्ह्यातील अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करू इच्छित आहे.ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है असे देखील आ.दानवे म्हणाले