हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

‘भारतानं अद्वितीय योद्धा गमावला…” म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

Chief of Defence Staff General Bipin Rawat

नवी दिल्ली,८ डिसेंबर/प्रतिनिधी:-

आज 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या दुर्दैवी हवाई अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) अध्यक्ष मधुलिका रावत आणि लष्कराचे इतर 11 कर्मचारी यांचा अकाली मृत्यू झाल्याबद्दल जनरल एम एम नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून अतीव दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाच्या दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला. देशी बनावटीच्या लष्करी सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यामध्ये आणि भारताच्या संयुक्त थिएटर कमांडचा पाया घालण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी दिलेला हा वारसा पुढे सुरू राहील आणि पुढील अनेक पिढ्या तो बळकट करतील.

संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) माजी अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेल्या मधुलिका रावत यांची अनुपस्थिती सर्वांनाच हेलावून टाकेल.त्याचप्रकारे सीडीएस आणि डीडब्लूडब्लूएच्या अध्यक्षांसोबत वेलिंग्टनला जात असलेल्या लष्कराच्या 11 कर्मचाऱ्यांची सर्वांनाच सदैव उणीव भासेल. त्यांनी सशस्त्र दलाच्या सर्वोत्तम परंपरांनुसार आपले कर्तव्य बजावले.

तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत  यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात  असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. या निधनामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे.सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव उद्या दिल्लीला आणलं जाणार आहे. 

सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.

कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह नऊ जण बुधवारी सकाळी 9 वाजता विशेष विमानाने दिल्लीहून निघाले आणि सकाळी 11.35 च्या सुमारास एअरफोर्स स्टेशन सुलूर इथं दाखल झाले.

सकाळी 11:45 वाजता, दिल्लीतील 9 जण आणि पाच क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण 14 लोक एअर फोर्स स्टेशन सुलूर इथून हेलिकॉप्टरने वेलिंग्टन आर्मी कॅम्पसाठी रवाना झालं.

Image

दुपारी 12.20 च्या सुमारास नाचपा चतरम इथल्या कट्टारिया भागात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हेलिकॉप्टर एअरफोर्स स्टेशन सुलूर इथून उड्डाण घेतल्यानंतर सुमारे 94 किमी प्रवास केल्यानंतर कट्टारिया परिसरात अपघात झाला.

अपघातस्थळ आणि ज्या ठिकाणी पोहाचायचं होतं ते वेलिंग्टन आर्मी कॅम्प यात फक्त 16 किमीचं अंतर होते. म्हणजेच वेलिंग्टन आर्मी कॅम्पच्या 16 किलोमीटर आधी जनरल रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 

हेलीकॉप्टर मध्ये कोण कोण होते?

जनरल बिपिन रावत, CDS, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image

हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. बिपीन रावत यांचा फोटो शेअर करत मोदी यांनी लिहिले, ‘जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन अपवादात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.’

तमिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांच्या मृत्युबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या संदर्भात केलेल्या विविध ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;

“तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे मला अतिशय दुःख झाले आहे ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांना गमावले आहे. त्यांनी संपूर्ण समर्पित वृत्तीने देशाची सेवा केली. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

जनरल बिपिन रावत एक असामान्य सैनिक होते. एक खरे देशभक्त होते. आपल्या सशस्त्र दलांचे आणि संरक्षण सामग्रीचे आधुनिकीकरण करण्यात त्यांनी खूप मोठे योगदान दिले. संरक्षणविषयक घडामोडींविषयींची त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असाधारण होते. त्यांच्या निधनामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. ओम शांती.

भारताचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांनी आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित संरक्षण सुधारणांसह विविध पैलूंवर काम केले. त्यांच्या असामान्य सेवेला देश कधीही विसरणार नाही.”

जनरल बिपिन रावत हे शूर सैनिकांपैकी एक होते ज्यांनी मातृभूमीची अत्यंत निष्ठेने सेवा केली -अमित शाह

अमित शहा यांनी मधुलिका रावत आणि  सशस्त्र दलाच्या 11 अन्य कर्मचाऱ्यांच्या दुःखद निधनाबद्दलही तीव्र शोक व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी  ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीत  लवकर सुधारणा व्हावी यासाठी  प्रार्थना केली.

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी कोईम्बतूरजवळ एका हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अमित शाह यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, “देशासाठी आज अत्यंत दु:खद दिवस आहे , आपण आपले  चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला अतिशय दुःख होत आहे. मधुलिका रावत आणि सशस्त्र दलाच्या 11 अन्य कर्मचाऱ्यांच्या दुःखद निधनाबद्दलही  मी शोक व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.”

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ,चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शोकाकुल कुटुंबातील सदस्यांविषयी तीव्र संवेदना व्यक्त करताना, उपराष्ट्रपतींनी आज हैदराबाद येथील एका कार्यक्रमात अपघातामध्‍ये प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे मौन पाळण्याची विनंती केली. जनरल रावत यांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करत, नायडू यांनी रावत यांच्या  निधनामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचे सांगितले आणि हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्‍ये झालेली प्राणहानी ही एक मोठी शोकांतिका असल्याचे नमूद केले.

जनरल रावत यांच्‍यामध्‍ये असलेले  नेतृत्व गुण  आणि त्यांची दूरदृष्टी ठेवून कार्य  करण्याची पद्धत यासाठी देशातील जनता त्यांची कायम ऋणी राहील, असे उपराष्ट्रपती म्हणाले.