औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 908 कोरोनामुक्त, 73 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,८ डिसेंबर /प्रतिनिधी:-औरंगाबाद जिल्ह्यात आज 10 जणांना (मनपा 06, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 627 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 06 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 627 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 646 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 73 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (06)

नंदनवन कॉलनी 1, अन्य 5

घाटी (01)

मृत्यू (01)

1.95 स्त्री, गाडेगाव ता.औरंगाबाद