महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वैजापुरात अभिवादन

वैजापूर ,६ डिसेंबर /प्रतिनिधी :- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सोमवारी (ता.6) वैजापूर येथे शहरातील नागरिकांतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी राज्यघटनेची माहिती देऊन शिक्षणाचे महत्त्व विषद केले तर नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी वैजापूर शहरातील मुख्य चौकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पुतळ्याचे 1 जानेवारी 2022 रोजी अनावरण व लोकार्पण करण्याचे जाहीर केले.जयाबाई पंडित, सिंधू धिवरे, रंजना साळवे, भामाबाई साळवे, लता साळवे, कीर्ती वाघ यांनी भीम वंदना सादर केली. सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी सुत्रसंचलन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, डॉ.व्ही.जी.शिंदे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव,जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन वाणी, शहराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, प्रशांत त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, दीपक त्रिभुवन, दिवाकर त्रिभुवन, संजय बत्तीसे, पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, डॉ.संतोष गंगवाल, पोलीस नाईक संजय घुगे, पो.कॉ. हुकूमसिंग डोंगर, खलील मिस्तरी, पारस घाटे, ज्ञानेश्वर शिरसाठ, विशाल त्रिभुवन, विलास म्हस्के, प्रमोद निकाळे, दिलीप अनर्थे, बाबासाहेब वाघ, ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.