रक्तदान महानदान – आमदार अंबादास दानवे

आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त १०५ दात्यांनी केले रक्तदान

रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचते यापेक्षा मोठे पुण्यकर्म दुसरे नाही दानात सर्वश्रेष्ठ रक्तदान  मानले जाते. रक्तदान केल्याने  रक्तदात्यालाही त्याचा फायदा होतो. रक्तदात्यांच्या शरीरात चोवीस तासात नवीन रक्त तयार होते त्यामुळे रक्तदात्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्याने असंख्य रोगापासून मुक्तता मिळते तसेच रक्तदानामुळे आपण एखाद्याचा जीव वाचू शकलो याचे आत्मिक समाधानही मिळते म्हणून रक्तदान म्हणजे महानदान आहे. आयोजकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून अशा प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम घेतल्यामुळे त्यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना अजबनगर, कैलासनगर शाखा त्याचप्रमाणे व्यापारी आघाडीचे रवि लोढा, संजय लोहिया  यांच्यावतीने शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले शहरातील औरंगाबाद ब्लड बँकेने रक्त संकलनाचे कार्य केले.यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे,उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, विभाग प्रमुख माजी नगरसेवक सतिश कटकटे, महिला आघाडी उपशहर संघटक माजी नगरसेविका  सुनिता ताई सोनवणे, सुषमा यादगिरी,आयोजक व्यापारी आघाडीचे जिल्हा संघटक संजय लोहिया, उपजिल्हा संघटक रवी लोढा, रणजित दाभाडे, प्रविण शिदे, गणेश अंबिलवादे औरंगाबाद ब्लड बँकेचे शामराव सोनवणे त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.