सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

औरंगाबाद,६ डिसेंबर /प्रतिनिधी:- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील २०२०- २०२१ मध्ये अंतिम वर्षात  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्याचेकॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन वर्षभरामध्ये  

करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना रुपये ३.३६ ते १० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. 

Displaying CSMSS Logo.jpg

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकँनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कोरोना महामारीत सुद्धा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत प्लेसमेंटचा आलेख चढता ठेवला आहे. विद्यार्थ्यांची निवड झालेली कंपन्यामध्ये कॅपजेमिनी (४५), टी. सी. एस. (४१), इन्फोसिस (२५), ऍक्सेंचर (२२), कॉग्निझंट (२१), विप्रो (२०), अँमडॉकस (११), लिभेर अप्लायन्सेस (२३), औरंगाबाद ऑटो अँसिलरी (४५), जे. बी. एम. ग्रुप (१०), बायजुज (९), जबील (७) वात्सल्य (७), शारदा इन्फ्राटेक (५), एन्ड्युरन्स (५), टेक महिंद्रा (४), ग्राइंड मास्टर (४), अटॉस सिन्टेल (४), व्हरॉक (४), हेक्सावेर (४), एक्सिडी इंडिया लिमिटेड (३), कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (३), रिलायन्स जिओ (२), निओसॉफ्ट (२), पर्सीस्टण्ट (२), ब्रूकहार्ट कॉम्प्रेशन (१), टाटा टेक्नॉलॉजीज (१), कुबाटिक (१), एंड्रेस + हाउसर (१), न्यूटेक इलेक्ट्रिकल (१), जिंदाल ग्रुप (१) तसेच इतरही कंपन्यांचा समावेश आहे.
                                                      या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास बी. शिंदे, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दीपक पवार, विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, डॉ. संदीप अभंग, प्रा. अभय मुदिराज, डॉ. देवेंद्र भुयार, प्रा. सोहेल अली, प्रा. संजय कुलकर्णी, यांनी अभिनंदन केले व 

पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.