राष्ट्रपती आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

नवी दिल्ली,५ डिसेंबर/प्रतिनिधी:-राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून म्हणजेच, 6 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान  महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

6 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट देतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करतील.

7 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती, भारतीय हवाई दलाचा तळ, लोहगाव, पुणे येथे भेट देतील. तिथे ते  हवाई कसरतींची  (फ्लाईंग डिस्प्ले ) पाहणी करतील तसेच  हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधतील.

8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती मुंबईत क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीला राष्ट्रपती प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड हा विशेष सन्मान प्रदान करतील.