मतपेढीचे राजकारण केले नाही तर लोकसेवेला प्राधान्य दिले-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते  देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

भारत आज आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने आगेकूच

नवी दिल्ली,४ डिसेंबर/प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये दिल्ली- देहरादून आर्थिक कॉरिडॉर (इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे जंक्शन ते  देहरादून ), दिल्ली- देहरादून  इकॉनॉमिक कॉरिडॉरपासून ग्रीनफिल्ड अलाइनमेंट प्रकल्प, हलगोवाला जोडणारा, सहारनपूर ते भद्राबाद, हरिद्वार, हरिद्वार रिंग रोड प्रकल्प, देहरादून – पांवटासाहिब (हिमाचल प्रदेश)रस्ते प्रकल्प , नजीबाबाद-कोटद्वार रस्ता रुंदीकरण प्रकल्प आणि लक्ष्मण झुलाशेजारी गंगा नदीवर पूल, या पुलांचा समावेश आहे.  देहरादून बालस्नेही शहर प्रकल्प,  देहरादूनमधील पाणीपुरवठा, रस्ते आणि सांडपाणी निचरा व्यवस्थेचा विकास, श्री बद्रीनाथ धाम आणि गंगोत्री-यमुनोत्री धाम येथे पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे आणि हरिद्वारमधील वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली.

या प्रदेशातील भूस्खलनाची दीर्घकालीन समस्या सोडवून प्रवास सुरक्षित करण्यावर  लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय महामार्ग -58 वर ब्रह्मपुरी ते कोडियाला आणि देवप्रयाग ते श्रीकोट रस्ता रुंदीकरण प्रकल्प , यमुना नदीवर बांधलेला 120 मेगावॅट व्यासी जलविद्युत प्रकल्प, देहरादून  येथील हिमालयीन सांस्कृतिक केंद्र  आणि देहरादूनमधील  अत्याधुनिक सुगंधी प्रयोगशाळा केंद्र यांचे उदघाटनही  पंतप्रधानांनी केले.

यावेळी एका सभेला पंतप्रधानांनी  संबोधित केले. उत्तराखंड हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचेही प्रतीक आहे,  त्यामुळेच राज्याचा विकास हा केंद्र आणि राज्याच्या दोन्ही सरकारांच्या  अग्रक्रमांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. या शतकाच्या सुरुवातीला अटलजी यांनी भारतात दळणवळण  वाढवण्याची मोहीम सुरू केली होती यावर त्यांनी भर दिला. मात्र, त्यानंतर 10 वर्षे देशात असे सरकार होते, ज्याने देशाचा आणि उत्तराखंडचा बहुमूल्य वेळ वाया घालवला, असे पंतप्रधान म्हणाले. “देशात पायाभूत सुविधांच्या नावावर 10  वर्षे केवळ  घोटाळे झाले. देशाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत केली आणि आजही करत आहोत.” बदललेल्या कार्यशैलीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आज भारत आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करत आहे. भारताचे आजचे धोरण ‘गतिशक्ती’चे , दुप्पट किंवा तिप्पट वेगाने काम करण्याचे आहे.

संपर्क वाढविण्याच्या फायद्यांबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले की, 2012 मध्ये झालेल्या केदारनाथ दुर्घटनेपूर्वी 5 लाख 70 हजार लोकांनी तेथे दर्शन घेतले होते. हा त्यावेळचा दर्शनसंख्येचा विक्रम होता. तर कोविड कालावधी सुरु होण्याआधी 10 लाखांहून अधिक लोक केदारनाथ क्षेत्राला भेट देण्यासाठी आले होते. “केदारधाम देवस्थानच्या पुनर्बांधणीनंतर तिथे भेट देणाऱ्या भक्तांच्या संख्येतच वाढ झाली असे नव्हे तर तिथल्या स्थानिक लोकांना त्यातून रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.

दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉरची कोनशीला रचल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “जेव्हा हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा दिल्लीहून देहरादूनला जाण्यासाठी सध्या लागणारा वेळ निम्म्याने कमी होईल.” अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “आपले पर्वत केवळ आपला विश्वास आणि आपल्या संस्कृतीचे मजबूत आधार नाहीत तर ते देशाचे संरक्षण करणारे मजबूत किल्ले आहेत. पर्वतीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक सुखकर करणे ही गोष्ट आपल्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेल्या बाबींपैकी एक आहे. दुर्दैवाने, अनेक दशके जे लोक सरकारात होते त्यांच्यासाठी कधी धोरण तयार करण्याच्या पातळीवर देखील ह्या लोकांचा विचार अस्तित्वात नव्हता.”

विकासाच्या वेगाची तुलना करताना, 2007ते 2014 या काळात तत्कालीन केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये केवळ 288 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम केले, तर सध्याच्या सरकारने सात वर्षांच्या कार्यकाळात उत्तराखंडमध्ये 2 हजार किलोमीटर्सहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम पूर्ण केले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

आधीच्या सरकारांनी सीमाभागातील पर्वतीय प्रदेशात पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात गांभीर्याने काम केले नाही याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “देशाच्या सीमेजवळ रस्ते बांधायला हवे होते, पूल बांधायला हवे होते. पण त्यांनी याकडे लक्षच दिले नाही.” ‘एक श्रेणी- एकसमान निवृत्तीवेतन’, आधुनिक शस्त्रास्त्रे, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे योग्य रीतीने लक्ष पुरविले गेले नाही आणि त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मनोधैर्याचे प्रत्येक पातळीवर खच्चीकरण झाले. “सध्या सत्तेत असलेले सरकार जगातील कोणत्याही देशाच्या दबावाखाली येऊ शकत नाही. आम्ही देशाला प्रथम स्थानी ठेवणे आणि नेहमीच देशाला पहिले महत्त्व देणे हाच मंत्र जपणारे लोक आहोत.” असे ते पुढे म्हणाले.

एकाच जातीला,धर्माच्या लोकांना प्राधान्य देणे, विकासविषयक धोरणे लागू करताना भेदभाव करणे अशा पद्धतीच्या राजकारणावर पंतप्रधानांनी तीव्र टीका केली. देशातील लोकांना सक्षम होण्याची संधी न देणाऱ्या आणि त्यांच्या गरजांसाठी त्यांना सतत सरकारवर अवलंबून राहण्यास भाग पाडणाऱ्या विकृत राजकारणावर देखील त्यांनी हल्ला चढविला. देश चालविताना वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्या विद्यमान सरकारच्या विचारसरणीबद्दल त्यांनी विचार मांडले, “आमचा हा वेगळा मार्ग आहे, भले हा कठीण मार्ग असेल पण तो देशाच्या कल्याणाचा मार्ग आहे.हा मार्ग ‘सबका साथ-सबका विकास’ चा मार्ग आहे. आम्ही म्हणालो होतो की ज्या योजना आम्ही सुरु करू त्या सर्वांसाठी लागू असतील, त्यात भेदभाव नसेल. आम्ही एकगठ्ठा मतांच्या बँकेच्या राजकारणाचा आधार घेत नाही तर सामान्य लोकांना सोयीसुविधा पुरविण्याला प्राधान्य देतो. देशाला मजबूत करणे हा आमचा दृष्टीकोन आहे,” असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ह्या अमृतकाळात, देशाच्या प्रगतीने घेतलेला वेग आता थांबणार नाही, मंदावणारही नाही. उलट आता आम्ही अधिक विश्वासाने आणि निश्चयाने प्रगती करत राहू.” अशी ग्वाही देत भाषण संपविताना शेवटी पंतप्रधानांनी ही उत्साहपूर्ण कविता उधृत केली.

“जहाँ पवन बहे संकल्प लिए,

जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं,

जहाँ ऊँचे नीचे सब रस्ते

बस भक्ति के सुर में गाते हैं

उस देव भूमि के ध्यान से ही

उस देव भूमि के ध्यान से ही

मैं सदा धन्य हो जाता हूँ

है भाग्य मेरा,

सौभाग्य मेरा,

मैं तुमको शीश नवाता हूँ

तुम आँचल हो भारत माँ का

जीवन की धूप में छाँव हो तुम

बस छूने से ही तर जाएँ

सबसे पवित्र वो धरा हो तुम

बस लिए समर्पण तन मन से

मैं देव भूमि में आता हूँ

मैं देव भूमि में आता हूँ

है भाग्य मेरा

सौभाग्य मेरा

मैं तुमको शीश नवाता हूँ

जहाँ अंजुली में गंगा जल हो

जहाँ हर एक मन बस निश्छल हो

जहाँ गाँव गाँव में देश भक्त

जहाँ नारी में सच्चा बल हो

उस देवभूमि का आशीर्वाद लिए

मैं चलता जाता हूँ

उस देवभूमि का आशीर्वाद

मैं चलता जाता हूँ

है भाग्य मेरा

सौभाग्य मेरा

मैं तुमको शीश नवाता हूँ

मंडवे की रोटी

हुड़के की थाप

हर एक मन करता

शिवजी का जाप

ऋषि मुनियों की है

ये तपो भूमि

कितने वीरों की

ये जन्म भूमि

मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ