बीड शहरात आठ दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी घोषित – जिल्हाधिकारी

बीड :शहरात बुधवारी कोरोना विषाणू ची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत .त्यामुळे बीड शहरात कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरात  आठ दिवसासासाठी म्हणजेच नऊ जुलै पर्यंत संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे .

Image
Image

*कोविड १९-बीड अपडेट – 01/जुलै/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब – 54 *निगेटिव्ह अहवाल – 48 *पॉजिटिव्ह अहवाल – 03 Inconclusive अहवाल-01 रिजेक्ट अहवाल-02

  • 29वर्षे महिला – रा.अजीजपुरा, बीड
  • 48वर्षे पुरूष – रा. जुना बाजार,बीड
  • – 66वर्षे महिला, रा.कारंजा रोड, बीड

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री काढलेल्या आदेशात याकाळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही .वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्र, अत्यावश्यक सेवा देणारी सहा विभागाची कार्यालये वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील .शहरात परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नाही .वैद्यकीय कारण वगळता ऑनलाइन व ऑनलाइन पास बंद राहतील .परवाना धारक भाजी व फळ विक्रेत्यांनी घरोघर जाऊन विक्री करावी असे ही या आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *