कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 59.43 टक्क्यांवर पोहोचला

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जवळपास 1 लाख 30 हजाराहून जास्त

नवी दिल्ली-मुंबई, 1 जुलै 2020

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारसह राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी उचललेल्या समन्वित पावलांमुळे आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,27,864 पेक्षा जास्त आढळून आले आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण आणखी वाढून 59.43 टक्के झाले आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,157 कोविड-19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,47,978 पर्यंतपोहोचली आहे.

सध्या 2,20,114 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 764 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 292 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1056 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 576 (शासकीय: 365 + खाजगी: 211)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 394 (शासकीय: 367 + खाजगी: 27)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 86 (शासकीय: 32 + खाजगी: 54)

नमुने तपासणीत दररोज सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2,17,931 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 88,26,585 नमुने तपासण्यात आले आहेत.

भारत सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या व्हेंटिलेटरमध्ये बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (बीआयपीएपी) मोड उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे काही माध्यमांच्या वृत्तानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश शासनासह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवलेले “मेक इन इंडिया” व्हेंटिलेटर हे अतिदक्षता विभागासाठी आहेत. या कोविड व्हेंटिलेटरसाठी तांत्रिक वैशिष्ट्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालकांच्या (डीजीएचएस), अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या तांत्रिक समितीने तयार केली आहेत ज्यानुसार व्हेंटिलेटरची खरेदी व पुरवठा झाला आहे. खरेदी व पुरवठा झालेल्या व्हेंटिलेटरमध्ये ही  वैशिष्ट्ये आहेत.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आलेले  बीईएल आणि अॅग्वा व्हेंटीलेटर मॉडेल्स तांत्रिक समितीने नमूद केलेल्या वैशिष्ट्यांनुसार आवश्यकतांचे पालन करतात. तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार बनविल्या जाणार्या या व्हेंटीलेटरमध्ये बीआयपीएपी मोड आणि इतर पद्धती आहेत. व्हेंटिलेटर युजर मॅन्युअल व अभिप्राय फॉर्मसह पुरवले जात आहेत ज्यांचा वापर शंकानिरसनासाठी करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *