राज्य सेवा मुख्य परीक्षा शनिवारपासून

औरंगाबाद,२ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत 4 ते 6 डिसेंबर2021 रोजी औरंगाबाद जिल्हा केंदावर विषयांकीत परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील परीक्षा 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते 5  तसेच दि. 5 व 6 डिसेंबर रोजी कालावधीमध्ये सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.सदरील परिक्षेसाठी एकूण 01 उपकेंद्रावर परीक्षा होणार असून परीक्षेसाठी एकूण 339 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. तसेच सदरील परीक्षेसाठी एकूण 56 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे परिपत्रक क्रमांक म.ला.आ./1093/प्र.क्र. 20/93/आठ, दि. 21 मे 1993 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांना नेमुन दिलेले काम करणे बंधन कारक आहे. तसेच सदरील कामामध्ये बैरहजर राहणाऱ्या अधिकरी, कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधीतांविरुद्ध कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे.

            परीक्षेस  येताना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकाराचे ड्रायव्हींग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

            प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत उमेदवार यांच्या बैठक क्रमांकानुसार दिलेल्या A,B,C,D वर्णक्षरांच्या संचापैकी त्याला दिलेल्या वर्णाक्षरांचाच प्रश्नपुस्तीकेचा संच वापरत आहे याची पर्यवेक्षक व समवेक्षकांनी सातत्याने खात्री करावी. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळया व निळया शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायाकिंत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणेतही सहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही. उमेदवार त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य  परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मानई आहे, असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी  परीक्षाकरीता बंदी  घालण्यात येईल.