जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता बाळगा- विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

नांदेड,२ डिसेंबर /प्रतिनिधी:- आपण बघू शकतो, लिहू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, शिकवू शकतो, आई-वडिलांची सेवा करू शकतो, सुवर्णपदक घेऊ शकतो. पण असे ही लोक आहेत की ते हे सगळ करू शकत नाहीत. आपल्याला हे मिळालं आहे, यासाठी सर्वांप्रती, ईश्वराप्रती, शिक्षकाप्रती  कृतज्ञता बाळगा, असे आवाहन  नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी यावेळी व्यक्त केले. 

Displaying DSC_0781.JPG

हैदराबाद मुक्ती दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभाच्या दुसऱ्या दिवशी दि. २ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत  होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे तर प्रमुख अतिथीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

तांबोळी पुढे म्हणाले, जीवनात प्रत्येक वेळी यश मिळाले म्हणून  हुरळून जाऊ नका आणि अपयश मिळाले तर नाउमेद होऊ नका. यशासह अपयशही पचविण्याची ताकद  ठेवा.  जीवनामध्ये अपयश मिळाले तेवढ्याच गतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेच्या युगामध्ये गतीला जास्त महत्व आहे. कोरोना अजून गेला नाही त्यामुळे मास्क लावा, लस घ्या, स्वतःची आणि आई-वडिलांची काळजी घ्या, असे आवाहनही यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

या समारंभामध्ये परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि रोख रक्कम धनादेशाद्वारे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये चौधरी सैसता (एम. एस्सी. प्राणीशास्त्र), गायकवाड रजनी (विद्यापीठातून दरवर्षी सर्वाधिकगुण), शेख नरगीस (रसायनशास्त्र सर्वप्रथम),मिलन शिंदे (एम.एस्सी. कॉम्प्यूटर), श्रद्धा घोरपडे (बी.एस्सी. बॉटनी), सूर्यवंशी दत्ता (एम.एस्सी. बॉटनी), महेश अलगुले (बी.ई. मेकॅनिकल), याशिका लालवाणी (एम.सी.ए.), साईनाथ पांचाळ (बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स),योगिता पाटील (बी.ई.इलेक्ट्रॉनिक्स), मदिना राहात (बी.एस्सी. रसायनशास्त्र), अमिता वाघमारे (एम.ए.हिंदी), अन्सारी फिरदोस (एम.एस्सी. फिजीक्स), मोहन कुरे (बी.एस.एल.-एल.एल.बी.), परमेश्वर सूर्यवंशी (एम.ए.अर्थशास्त्र), अदिती येरावार (एम.बी.ए.मुलींमधून), नंदकुमार ससाने (पत्रकारिता), अनुराधा इंगळे (बी.एस्सी.सूक्ष्मजीवशास्त्र), सुदीक्षा देशपांडे (विधी शाखा), वर्षा गोधने (एम.ए. एम.एस्सी. इलेक्ट्रोनिक मिडिया), प्रणिता जोशी (बी.ए. भूगोल), सरस्वती जाधव (एम. ए. इतिहास), अर्चना साबळे (एम.ए. राज्यशास्त्र), निशांत कदम (बी.कॉम.अंतिम वर्ष),श्रेया सारडा (बी.कॉम. मुलींमधून), पूजा बिराजदार (एम.एस्सी. मॅथ.), नीता बारसे (एम.ए. समाजशास्त्र), शुभांगी मस्के (एम. ए. तत्वज्ञान), मनीषा वंजे(एम.ए. लोकप्रशासन), मजीद कुरेशी (कला शाखा), राजेश्री गुट्टे (बी. ए.राज्यशास्त्र), चारुलता धारणकर (एल. एल. एम. बिझनेस लॉ), सुमित्रा दुधाळे (बी.एस्सी. सॉफ्टवेअर), सायली चव्हाण (बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी), माधव आगलावे (एम. एस्सी. SAN), राजेश्री गव्हाणे (एम.ए. मराठी), सुहासी रामधावे (बी.एस्सी. कम्प्युटर सायन्स), सुरज चौधरी (बी.एस्सी. बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर), तेजस्विनी सावंत (एम. ए. मानसशास्त्र), उमेश लोया (एम.बी.ए. संकुलातून), अश्विनी  मुंडलिक (विद्यापीठातून संस्कृत लँग्वेज). 

यावेळी विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने इंद्रधनुष्य तसेच राष्ट्रीय युवक महोत्सवात यश  संपादन केलेल्या विद्यार्थी तथा मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट स्वयंसेवक/स्वयंसेविका यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

कुलगुरू डॉ उद्धव भोसले अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाले, जीवनात शिक्षणाला महत्व आहे. तसेच कला, क्रीडा यांना देखील महत्व आहे. या क्षेत्रात देखील आपण चांगली कामगिरी करण्याचे ध्येय बाळगा. नुसते कष्ट नको, तर अचूकपणे काम करा. सांघिक जीवनातून राष्ट्र घडते. त्यासाठी एकीच्या भावनेत वाढ करा.आत्मपरीक्षण करा, असा सल्ला ही त्यांनी  दिला .  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंग बिसेन यांनी केले पाहुण्यांचा परिचय आणि  सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव  डॉ. सर्जेराव शिंदे  यांनी केले.