स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेचा महाराष्ट्रात 6 वा तर देशात 22 वा क्रमांक

औरंगाबाद,२० नोव्हेंबर /प्रतिनिधी:- देशभर राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेने देशात 22 वा तर महाराष्ट्रात 6 वा क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरा मध्ये राष्ट्रीय स्तरावर 22 वा क्रमांक मिळवला आहे मागील वर्षाच्या रॅकिंगमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक 26 होता तर देश पातळीवर शहराचा क्रमांक 88 होता तो सुधारून स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये एकूण 59 झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 हे 6000 गुणाचे सर्वेक्षण होते . त्यामध्ये सर्विस लेव्हल प्रोग्राम, प्रत्येक ची स्थळ पाहणी व व नागरिकांचे अभिप्राय या गोष्टीची तपासणी करण्यात आली. याच बरोबर या वर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रेरक दौरा सन्मान या पुरस्काराच्या प्रकारांमध्ये शहराला गोल्ड नामांकन प्राप्त झाले आहे गोल्ड हे नामांकन प्लॅटिनम या नामांकन नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नामांकन आहे महाराष्ट्रात इतर गोल्ड नामांकन मिळणारी मोठी शहरे पुणे नागपूर व नाशिक ही आहेत.असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त  करणार! | Aurangabad Municipal Corporation's waste collection planning for  Diwali, pre preparation of the ...

देशात सर्व राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. 2021 मध्ये देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेने देशात बाविसावा तर महाराष्ट्रात सहावा क्रमांक मिळवला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार तत्कालिन घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तन मनाने या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. शहराला देशात व महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यात महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, तत्कालीन घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटी, महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील प्रत्येक रस्त्याची ,नाल्याच्या, कचऱ्याची एकवेळोवेळी पाहणी केली. एवढेच नव्हे तर स्वतः कचरा उचलून स्वच्छतेला हातभार लावला.स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत आहेत . शहरातील कचरा तसेच रस्ते आणि नाले स्वच्छ करून शहराला स्वच्छ ठेवले जात आहे. शहर स्वच्छतेत नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

नागरिक व मनपा कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य:प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय

Image


औरंगाबाद शहराने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जी झेप घेतली आहे त्यात नागरिकांचा आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे शक्य झाले आहे, असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने देशपातळीवर बाविसावा तर महाराष्ट्रात सहावा क्रमांक पटकविला या संदर्भात बोलताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या 2021 मधील स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने झेप घेतली असून अतिशय आनंदाची बाब आहे .यात नागरिकांचा आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. यशामुळे नागरिकांच्या मनामध्ये शहराबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली असून स्वच्छतेबाबत सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. स्वच्छतेबाबत नागरिक सुज्ञ झाली असून शहराला सर्वांनी मिळून स्वच्छ ठेवायची आहे असे प्रशासक पाण्डेय म्हणाले. यापुढे शहराला मोठा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासन पुढील सात बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे, त्यात कन्ट्रक्शन अण्ड डेमाॅलिशन व्यवस्थापन, जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, सायंटिफिक लँड फिल व्यवस्थापन करणे, सार्वजनिक टॉयलेट व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर त्यातून उत्पन्न सोर्स निर्माण करणे, ई कचरा व्यवस्थापन करणे, हानीकारक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आदीवर भर देण्यात येणार आहे, असल्याचे मनपा प्रशासक तथाआस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.