मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने भाजपशी विश्वासघात केला- वैजापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रावसाहेब दानवे यांचा आरोप

वैजापूर ,२० नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने भाजपशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अभद्र आघाडी केली. अडीच वर्षात या आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही.सर्व आघाड्यांवर हे सरकार फेल गेले अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वैजापूर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना केली.

May be an image of 1 person and standing

या मेळाव्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस इद्रिस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

May be an image of 9 people, people standing and indoor

राज्यमंत्री दानवे यांनी आपल्या विशेष शैलीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी तोकडी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप केला. वैजापूर तालुक्याशी संबंधित रेल्वेसह अन्य प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी आपल्या भाषणात दिले.  

Image

राज्यात युतीचे सरकार असताना समुद्रात वाहून जाणारे इगतपुरीचे 168 टीएमसी पाणी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळवून या भागातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या होता.मात्र सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने या योजनेला खो दिला.असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आपल्या भाषणात म्हणाले.

May be an image of 5 people and people standing

या मेळाव्यात डॉ.राजीव डोंगरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश घेतला.शहरातील भाजप कार्यकर्ते दिनेश राजपूत यांची पक्षाच्या वैजापूर शहरपदी नियुक्ती करण्यात आली.मेळाव्यास जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, डॉ.एस.एम.जोशी, मोहन आहेर, कैलास पवार, प्रशांत कंगले, सुनील मिरकर, मधुकर वालतुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप,संदीप डोंगरे, नगरसेवक शैलेश चव्हाण, गणेश खैरे, दशरथ बनकर, माधुरी बनकर, जयश्री राजपूत, सविता पुणे, महेश भालेराव, संदीप पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.