वैजापूर तालुक्यातील विविध विकास कामांचे माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,२० नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या वैजापूर तालुक्यातील वाडीफाटा ते फकिराबादवाडी या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे व सवंदगांव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानचे संरक्षक भिंतीचे भूमीपूजन माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.आ.रमेश पाटील बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने  वाडीफाटा ते फकिराबादवाडी या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी स्थानिक विकास निधीतून 20 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत तर सवंदगांव येथील मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानच्या संरक्षक भिंतीसाठीही निधी उपलब्ध झाल्याने या दोन्ही विकास कामांचे भूमीपूजन माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी,माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाऊसाहेब पाटील गलांडे, कल्याण पाटील जगताप, संदीप बोर्डे, युवासेनेचे श्रीराम गायकवाड, नानासाहेब थोरात, बंडू गायकवाड, हरिभाऊ साळुंके, सतीश खंडागळे, रावसाहेब मोटे, सरपंच उद्धव पाटील बहिरट, मोहनराव साळुंक्रे, प्रकाश मतसागर, उमेश शिंदे, सरपंच गणेश इंगळे,दीपक बोर्डे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.