शिवसेना गुलमंडी शाखेतर्फे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

औरंगाबाद,१७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मध्य विधानसभा मतदार संघ अंतर्गत शिवसेना गुलमंडी शाखेतर्फे हिंदु  हृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पुजन मध्यचे शिवसेना आमदार प्रदिप जैस्वाल यांनी केले.

Displaying WhatsApp Image 2021-11-16 at 10.53.48 PM.jpeg


          यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे यांचे स्विय सहाय्यक अशोक पटवर्धन, शहरप्रमुख मध्य बाळासाहेब थोरात, नगरसेवक सचिन खैरे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुनिता देव, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, पुष्पा गव्हाणे, शहरसंघटक प्राजक्ता राजपुत, विधानसभासंघटक मिरा देशपांडे, उपशहरप्रमुख चंद्रकांत इंगळे, व्यापारी आघाडी उपजिल्हासंघटक विजय सुर्यवंशी, गुलमंडी शाखाप्रमुख सचिन ढोकरट, नरेश पूंड, व्यापारी आघाडी प्रसिध्दी प्रमुख मनिष भारुका, उपविभागप्रमुख सचिन लखासे, संदिप चांदणे, देशपांडे साहेब, विजय जैस्वाल, अभ्यागत समिती सदस्य नारायण कानकाटे, योगेश मिसाळ, महेश घोंगते, बाळु वाघ, युवासेना विभागप्रमुख राम फुलंब्रीकर, शाखाप्रमुख उमेश पलैये, अशोक पूंड, लक्ष्मण गिर्हे, महिला आघाडी उपशहरप्रमुख कविता सुरळे, विभागसंघटक वंदना कुलकर्णी, रुख्मिणी पवार, शाखासंघटक अंजली पाटील, सुशांत डांबरे, आदींसह शिव सैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व स्थानिक नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Displaying WhatsApp Image 2021-11-16 at 9.47.15 PM.jpeg

शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदु हृद सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल माम संचेती, अशोक पटवर्धन, प्रशांत मस्के, नगरसेवक सचिन खैरे, अभ्यागत समिती सदस्य नारायण कानकाटे, नरेंद्र पूंड, संतोष बोरुडे, सुशांत डामरे आदींची उपस्थिती होती.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवतीर्थ येथील शक्तीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतले.