शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेतर्फे अभिवादन

वैजापूर ,१७ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त वैजापूर तालुका शिवसेनेतर्फे बुधवारी येथे आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आ.बोरणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, खुशालसिंग राजपूत,कल्याण पाटील जगताप, भाऊसाहेब पाटील गलांडे, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, डॉ.संतोष गंगवाल, समीर लोंढे, प्रमोद कुलकर्णी, महेश बुणगे, प्रदीप साळुंके, बाळासाहेब जाधव, बळीराम राजपूत, कैलास बोहरा, कमलेश आंबेकर,प्रभाकर जाधव, बंडू गायकवाड, मल्हारी पठाडे, रामकृष्ण जोरे, शंकर मुळे, गणेश शेळके यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.