आयकर विभागाचे पुण्यात छापे

नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-आयकर विभागाने 11/11/2021 रोजी पुण्यातील एका उद्योगसमूहाशी संबधित ठिकाणी धाडी टाकून जप्तीची कारवाई केली. खननयंत्र, क्रेन, काँक्रिट मशिनरी या खाणकाम, बंदरे यांच्याशी संबधीत अवजड यंत्रांची निर्मिती उद्योगातील हा उद्योग समूह आहे. भारतातील सात शहरांमधील 25 ठिकाणी हे छापे घातले गेले.

या छाप्यांमध्ये अनेक दोषपूर्ण दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती मिळाली. ती जप्त करण्यात आली. या पुराव्यांच्या छाननीवरून करपात्र समूहाने आपला नफा कमी दाखवण्यासाठी क्रेडिट नोट्सद्वारे कमी विक्रीची नोंद, खर्चाच्या ठिकाणी अप्रमाणित व्यापारी शिल्लक येणे दाखवणे,  वापर नसलेल्या विनाशुल्क सेवांवरिल खर्चाच्या नकली नोंदी, विविध संबधितांकडे विनापडताळणी कमिशन रकमाची नोंद, महसुल भरण्यातील अक्षम्य दिरंगाई, घसाऱ्याचे चुकीचे दावे या मार्गे नफा लपवल्याचे दिसून येत आहे.  या संबधित प्रकारात विक्रेत्याने वा ब्रोकरने दिलेल्या रकमांच्या पावत्या, स्थावरमालमत्तेत बेहिशेबी गुंतवणूक, कर्जाने दिलेल्या बेहिशेबी रकमां आदीं बाबी सापडल्या व जप्त करण्यात आल्या.

या छापेसत्रात एक कोटींची बेहिशेबी रक्कम व दागिने जप्त करण्यात आले. या छाप्यांदरम्यान आढळून आलेली  तीन बँकखाती प्रतिबंधात्मक आदेशाखाली ठेवण्यात आली आहेत.

एकूण 200 कोटींहून अधिक बेहिशेबी उत्पन्नाचा छडा लावण्यासाठी हे छापे घातले गेले. या करपात्र समूहाने आतापर्यंत 120 कोटींच्या बेहिशेबी उत्पनाची कबुली दिली आहे.