वैजापूर तालुक्यातील वाकला येथे मंजूर झालेल्या 67 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वाकला येथे विविध योजनांतर्गत मंजूर झालेल्या 67 लक्ष 35 हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते रविवारी (ता.14) झाले.

आ.बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या जिल्हा परिषदअंतर्गत 5 नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम ( 35 लक्ष 35 हजार रुपये), जिल्हा परिषद शाळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (10 लक्ष रुपये),महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याचे सुशोभीकरण करणे (3 लक्ष रुपये ),छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण ( 3 लक्ष रुपये ), जांभळीचा आड ते तुराब मामु यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,दत्त मंदिर ते ब्राम्हण गल्लीपर्यंत  पेव्हर ब्लॉक बसविणे (4 लक्ष रुपये ),दत्त मंदिर ते वाकेश्वर मंदिरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे ( 3लक्ष रुपये )  या कामांचे भूमिपूजन व बाजारतळ येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ( 5 लक्ष रुपये ) अशा एकूण 67 लक्ष 35 हजार रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण आ.बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ,शिवसेनेचे उपतालुकप्रमुख बाळासाहेब जाधव, कल्याण जगताप,गोरख आहेर,महेश बुणगे,गोकुळ आहेर,नंदकिशोर जाधव,प्रकाश मतसागर, भिकन सोमासे, अंबादास खोसे, अरुण मगर, प्रकाश वाघ, राजेंद्र जाधव,सरपंच गणेश इंगळे,रविंद्र काटे,अनिल कुळघर, सोनी यांच्यासह कार्यकते व ग्रामस्थ उपस्थित होते