मुख्यमंत्री बरे व्हावे, शिवसेना पदाधिकारी यांचे ग्रामदैवत खंडोबाला साकडे

औरंगाबाद,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पश्चिम विधानसभा मतदार संघातील आमदार संजय शिरसाट व शिवसेना पदाधिकारी यांनी ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरात आज सकाळी महाआरती केली. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असे  साकडे  पश्चिम मतदार संघातील शिवसेना आमदार व पदाधिकारी यांनी खंडोबाला घातले .

Displaying IMG_4615.JPG

यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, विभाग प्रमुख रणजीत ढेपे, उपविभाग प्रमुख मनोज सोनवणे , शाखा प्रमुख ईश्वर पारखे, रामेश्वर पेंढारे, सतीष पारखे, युवा उपशहर अजय चोपडे, महेश कदम, शिवाजी शिंदे, गजानन पाटील, अजिंक्य गायकवाड, अभिजित देशमुख, संदीप कोसडीकर, संजय भुजबळ, किरण देवकाते, कमलेश खोबरे, भरत सोनवणे, पुजारी विशाल धुमाळ, महिला आघाडीच्या कमल चक्रे आदींची उपस्थिती होती.