लेबर कॉलनी येथील जीर्ण झालेल्या इमारती पाडणार 

विविध पथकांची नेमणूक

औरंगाबाद,१४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विश्वासनगर, लेबर कॉलनी येथील शासकीय निवासी इमारती जीर्ण झाल्याने त्या  पाडण्यासाठी विविध पथकांची  नेमणूक केली असून या पथकांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन निर्देश दिले.

Displaying IMG_20211114_125705.jpg

            या आढावा बैठकी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंदार वैद्य, पोलीस उपाधिक्षक उज्जवला बनकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नेमण्यात आलेले पथक पुढील प्रमाणे.

अनु.क्र.पथकास नेमून दिलेले कामपथकातील अधिकारी/कर्मचारी यांचे  पदनाम
1विद्युत पुरवठा खंडीत करून महावितरणाची यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबतकार्यकारी अभियंता (शहर) महावितरण कंपनी, औरंगाबाद
2दुरध्वनी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबतउपमहाव्यवस्थापक, भारत संचार निगम लि. औरंगाबाद
3पाणी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबतकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महानगरपालिका, औरंगाबाद
4सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वळती करणेबाबतसहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पोलीस आयुक्तालय, औरंगाबा
5आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील वार्ड/ आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवणेबाबतअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद
6नकाशा तयार करुन निवासस्थाने पाडण्याची कार्यवाही करण्याअगोदर सदरील निवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना घरातून बाहेर काढणे इमारतीचा ताबा घेणे, याबाबतच्या आवश्यक त्या नोंदी ठेवणे आदी बाबीकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद
7आवश्यक वाहने यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबतप्रादेशिक परिवहन अधिकरी औरंगाबाद
8आवश्यक वाहने, यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबत1.       प्रादेशिक परिवाहन अधिकारी, औरंगाबाद2.      जिल्हा खनिकर्म अधिकारी औरंगाबाद3.      कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग,औरंगाबाद4.    कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, मनपा औरंगाबाद
9पंचनामा पथक1.       1.तहसिलदार खुलताबाद2.      2. तहसिलदार कन्नड
10शोध पथक1.       1. तहसिलदार वैजापूर2.      2. तहसिलदार गंगापूर
11प्राप्त अजाची छाननी करणेमुख्याधिकारी, नगर परिषद कन्नड
12बचाव साहित्य उपलब्ध करुन देणेबाबत1.       1. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,  औरंगाबाद2.      2. मुख्य अग्नीशमन अधिकारी, मनपा औरंगाबाद
13समन्वय/प्रतिबंधात्मक आदेश1.       पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रमीण2.      नायब तहसिलदार, गृहशाखा जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
14अग्नीशमन यंत्रणा व जबान सुसज्ज ठेवणेबाबतमुख्य अग्नीशमन अधिकारी, मनपा औरंगाबाद
15चित्रिकरण करणारे कॅमेरे उपलब्ध करुन देणेबाबतउपजिल्हा निवडणूक अधिकारीजिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
16पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करणेबाबतजिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
17मजुर/हमाल पुरविणेबाबतसहायक आयुक्त कामगार, औरंगाबाद