श्री भद्रा मारुती संस्थानच्या अध्यक्षपदी मिठु बारगळ यांची फेर निवड

खुलताबाद,१४ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- श्री भद्रा मारुती संस्थानच्या अध्यक्षपदी मिठु बारगळ तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब  बारगळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

श्री भद्रा मारुती संस्थानचे कार्यकारी मंडळ एकूण सतरा जणांचे होते. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सतरा वरून नऊ जणांचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. जेष्ठ विश्वस्त माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झालेली कार्यकारिणी अशी: अध्यक्ष मिठू बारगळ, उपाध्यक्ष बाबासाहेब बारगळ, सचिव आमदार अतुल सावे, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष पोपट जैन, विश्वस्त चंद्रकांत खैरे,यावेळी संस्थांनचे सर्व सदस्य व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.