महागाईवरचे लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

एसटी  संपाबाबत विरोधकांना नाट्य पुरस्कार देऊ-संजय राऊत

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.देशातील प्रमुख प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी  आग भडकवण्याचे काम सुरू केल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी भाजपावर हल्ला चढविला.

अमरावती शहरात दंगल घडली असा उल्लेख करुन राऊत म्हणाले, महागाई सारख्या ज्लवंत प्रश्नावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष दंगली घडवण्याचे कारस्थान करीत आहे. महागाई बद्दल प्रश्न विचारला की भारत – पाकिस्तानचा मुद्दा काढला जातो, चिनच्या घुसखोरीचा मुद्दा काढला जातो, सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा काढला जातो. देशातील नागरिकांची दिशाभूल केली जाते.आता महाराष्ट्रात दंगे पेटवण्याचे कारस्थान सुरु झाले आहे. जसजसा केंद्र सरकार विरुध्द आक्रोश सुरु झाला तसतसे दंगे भडकवले जात आहेत आणि केंद्र सरकार अशा कृत्यांना पाठिशी घालत आहे. जे सरकार माझ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कटकारस्थान करीत आहे, त्या सरकारला हा मोर्चा म्हणजे एक इशारा आहे. तुम्ही कितीही कारस्थान करा, आम्ही त्या कारस्थानाच्या छाताडावर उभे राहून पुढे जाऊ. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आणि मराठवाड्याने महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली. थाळ्या वाजवून करोना जात नाही आणि महागाई देखील जात नाही हे सरकारने लक्षात घ्यावे असे राऊत म्हणाले.  

 एसटी संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. डोकी भडकावून भाजपला राजकीय लाभ घ्यायचाय आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

शिवसेना सेठजी, बिल्डरचा पक्ष नाही. विरोधकांना लोकांची डोकी भडकवायची आहेत. एसटी कामगार संप जे चिघळवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. भाजप नेते एसटी आंदोलनात जात आहेत. जमलं तर त्यांना नाट्य पुरस्कार देऊ,  असा टोला शिवसेना नेते  संजय राऊत यांनी मारला. डोकी भडकावून भाजपला लाभ घ्यायचा आहे. पण यातून कामगार मरतोय, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना हा सेठजी, बिल्डरांना पक्ष नाही. हा कामगारांचा मोर्चा आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा ते त्यांचा संप चिघळवत आहेत अशी टीका त्यांनी केली. 

एसटी कामगार संप जे चिघळवताय ते कोण आहे ते सगळ्यांना माहीत आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा, आता ते त्यांच्या संप चिघळवत आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून सुरु आहे. विलिनीकनावर घोडं अडलं आहे. मात्र विरोधी पक्षाना आता लोकांची डोके भडकवायची आहे. त्यांना यातून लाभ घ्यायचा दिसतोय, असे राऊत म्हणाले.