मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम

मुंबई,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ.शेखर भोजराज यांनी दिली आहे.

या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ.अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ.शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य लाभो लाभावे, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महादेवाला साकडे घातले.
ग्रामदैवत खडकेश्वर महादेव मंदिर येथे महाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, उपशहर प्रमुख हिरालाल सलामपुरे, युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल, बंटी जैस्वाल, प्रमोद सावंत आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.