लस घेतली तरच वेरूळ लेणीत प्रवेश

Displaying IMG-20211111-WA0055.jpg

खुलताबाद,११ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लसीची किमान एक तरी मात्र घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतर वेरूळ लेणीत प्रवेश दिला जात आहे. ज्यांनी एकही लस घेतलेली नाही अशा पर्यटकांना लस घेण्यासाठी याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Displaying IMG-20211111-WA0054.jpg

 
वेरूळ लेणी येथे तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण शिंदे,  वैद्यकीय अधिकारी डॉ बलराज पांडवे, पुरातत्त्व विभागाचे राजेश वाकलेकर, आरोग्य विस्तार अधिकारी शशिकांत ससाणे , मंगेश शिंदे,  ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे यांच्या उपस्थितीत या लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. 
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील बीबी मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटनस्थळांसाठीही हा आदेश लागू आहे. पर्यटनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये व पर्यटन आयोजकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्र सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील बीबी मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा,अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटनस्थळांसाठीही हा आदेश लागू आहे.

Displaying IMG-20211111-WA0048.jpg

पर्यटनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये व पर्यटन आयोजकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्र सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. लसीची एकही मात्र न घेतलेल्या नागरिकांना सरकारी अथवा खासगी गाडीने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही. पर्यटन स्थळांवरील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, दुकाने यामधील कर्मचारी व मालकांनी लसीची किमान एक तरी मात्र घेतलेली असणे बंधनकारक आहे. एकही लस घेतली नसेल तर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्रवेश मिळणार नाही.