औरंगाबाद जिल्ह्यात दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 2669 कोरोनामुक्त, 2357 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 29 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2669 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 113 जणांना सुटी दिलेल्या मनपा हद्दीतील 74, ग्रामीण भागातील 39 जणांचा यात समावेश आहे. आज एकूण 246 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 143, ग्रामीण भागातील 103 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 154 पुरूष, 92 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 5283 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 257 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2357 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सायंकाळी आढळलेल्या 44 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) असून त्यात 31 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे.*औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (29)*सद्गुगुरु सो., चिकलठाणा (1), समृद्धी नगर,एन चार, सिडको (1), उल्कानगरी (1), जाफरगेट (1), वसंत नगर, जाधववाडी (1) न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (1), आरेफ कॉलनी (1), अरिहंत नगर (1), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (1), पंचायत समिती परिसर, गणेश कॉलनी (1), टीव्ही सेंटर (1), उस्मानपुरा (2), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटलजवळ (2), राहुल नगर,रेल्वे स्टेशन (1), बायजीपुरा (1), मुकुंदवाडी (1), रोशनगेट (1), शिवशंकर कॉलनी (1), बालक मंदिर (1), भारत मंदिर(1), एन सात सिडको (1), घृष्णेश्वर कॉलनी (1), एन सहा, एमजीएम वसतीगृह परिसर (1), रशीदपुरा (1), नॅशनल कॉलनी (2), गजानन नगर, गारखेडा (1)*ग्रामीण भागातील रुग्ण (15)*रांजणगाव (2), कन्नड (1), गणेश नगर, सिडको महानगर (1) सारा वृंदावन, सिडको वाळूज (1), श्रीराम कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (1) वडनेर, कन्नड (1), बेलखेडा कन्नड (1) साऊथ सिटी, बजाज नगर (1), ममता हॉस्पीटल, बजाज नगर (1), ज्योतिर्लिंग सो., बजाज नगर (1), कोलगेट कंपनीसमोर, बजाज नगर (1), साऊथ सिटी (1), वाळूज, गंगापूर (1), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर, वाळूज (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 28 जून रोजी औरंगाबाद शहरातील उस्मानपुऱ्यातील द्वारकापुरीमधील 64 वर्षीय पुरूष, जयभवानी नगरातील 94 वर्षीय पुरूष, देवळाई सातारा परिसरातील 55 वर्षीय पुरूष, भीम नगर, भावसिंगपुऱ्यातील 27 वर्षीय पुरूष, कुंभारवाड्यातील 77 वर्षीय पुरूष, 29 जून रोजी सदफ कॉलनीतील 45 वर्षीय पुरूष, औरंगाबाद जिल्ह्यातील पळशीतील 90 वर्षीय स्त्री, औरंगाबाद शहरातील शहागंज येथील 60 वर्षीय पुरूष, एन सहा, सिडकोच्या राजे संभाजी कॉलनीतील 52 वर्षीय पुरूष, जुना बाजार येथील 75 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत एकूण 200 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 196 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 196, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 60, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 257 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *