कोरोनामुक्त रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत 1,11,602 लाखपेक्षा अधिक
नवी दिल्ली, 29 जून 2020
कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या, सुनियोजित, पूर्वदक्षता घेऊन कालबद्ध, आणि सक्रीय प्रयत्नांचे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.
बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत आज 1,11,602 इतकी झाली आहे. एकूण 3,21,722 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर, हळूहळू वाढत असून 58.67 टक्के इतका झाला आहे.


गेल्या 24 तासांत, कोविड-19 चे एकूण 12,010 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या देशात, 2,10,120 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
भारतात आता कोविड च्या निदानासाठी 1047 प्रयोगशाळा आहेत. यापैकी, 760 प्रयोगशाळा सरकारी, तर 287 खाजगी क्षेत्रात आहेत.गेल्या 24 तासात ,आणखी 11सरकारी प्रयोगशाळा कार्यरत झाल्या आहेत.
या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :–
• रियल टाईम –RT पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 567 (सरकारी: 362 + खाजगी: 205)
• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 393 (सरकारी :366 + खाजगी: 27)
• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (सरकारी: 32 + खाजगी: 55)
एकूण तपासलेल्या चाचण्यांची संख्या वाढत असून ती आता 83,98,362 पर्यंत पोचली आहे. कालच्या दिवसात एकूण 1,70,560 चाचण्या करण्यात आल्या.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “मोदी सरकार कोविड परिस्थिती अत्यंत योग्य प्रकारे हाताळत आहे आणि दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे, “दिल्लीत सामुदायिक संक्रमण झालेले नाही आणि चिंता करण्याचे कारण नाही”.
अमित शहा म्हणाले की, कोविड-19 महामारी विरोधात लढा देण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. जागतिक संदर्भांच्या तुलनेत आपली आकडेवारी बरीच बरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या महामारीच्या विरोधातील लढाईत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि देशातील 130 कोटी नागरिक यांच्यात भागीदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “या लढाईत राष्ट्र एकजुटीने उभे आहे आणि आपल्या कोरोना योद्धयांना सतत प्रोत्साहन देत आहे”. अमित शहा म्हणाले की, 10 लक्ष लोकांमागे जागतिक संसर्ग दर 1,250 आहे तर भारतात संसर्ग दर फक्त 357 आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आज भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के आहे, तर मार्च महिन्यात ते 7.1 टक्के होते”.
इतर
- केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आज “पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण (PM FME)” योजनेचेउद्घाटनझाले. आत्मनिर्भर भारताचा भाग असलेल्या या योजनेमुळे,या क्षेत्रात एकूण35,000कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील आणि नऊ लाख कुशल तसेच अर्ध-कुशल रोजगार निर्माण होतील. या योजनेमुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आठ लाख कंपन्यांना माहितीची उपलब्धता,प्रशिक्षण,अधिक वाव तसेच निर्दीष्टीकरण,म्हणजेच कंपनीला औपचारिक स्वरूप देण्याची संधी मिळेल. याच कार्यक्रमात योजनेची मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आली.
- केंद्रीय पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पंजाबमधल्या गोबिंदगड मंडीमध्ये माधवॲलॉइज्या कारखान्यामध्ये ‘सीआर’ म्हणजेच ‘कंटिन्यूअस रेबार’ निर्मितीच्या सुविधेचा प्रारंभ केला.याप्रसंगी बोलताना मंत्री प्रधान म्हणाले, ‘‘सर्वसाधारणपणे स्टील आणि विशेषतः गॅल्व्हनाइज्ड स्टील हे मजबूत,तसेच पर्यावरणाला अनुकूल साहित्य आहे. ही सामुग्री किंमतीचा विचार करता किफायतशीर आहे. पायाभूत क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी स्टीलच्या सामुग्रीला असलेली मागणी लक्षात घेऊन या क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. सध्या गॅल्वनाइज्ड स्टीलला असलेली मागणी आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे;हे लक्षात घेऊन अखंड गॅल्वनाइज्ड सळ्यांच्याउत्पादनाची सुविधा देशामध्येच निर्माण झाली तर बांधकाम उद्योगाला त्यांचा पुरवठा करणे सोईचे ठरणार आहे. अशा प्रकारचे उत्पादन,दीर्घकाळापासून बहुप्रतीक्षेमध्ये होते. या गरजेची पूर्तता आता देशातच होऊ शकणार आहे.’’
- चौथ्या राष्ट्रीय भू संशोधन तज्ञ बैठक,एनजीआरएसएममधे भू संशोधक विद्वानांनी नैसर्गिक संसाधने,जल व्यवस्थापन,भूकंप,मोसमी पाऊस,हवामान बदल,नैसर्गिकआपत्ती,नद्या यंत्रणा यासारख्यामुद्यांवरलक्ष केंद्रित करत,समाजासाठी भू विज्ञान यावर वेबिनारच्या माध्यमातून चर्चा केली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या डेहरादूनच्या वाडिया इंस्टिट्युट ऑफ हिमालयीन जीओलॉजी,डब्ल्यूआयएचजी,या स्वायत्त संस्थेने ही बैठक आयोजित केली होती.कोविड-19 मुळे यावर्षी चौथी एनजीआरएसएम वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आली होती.अशा प्रकारे आयोजित केलेलीडब्ल्यूआयएचजीची ही पहिली बैठक होती.देशातली 82 विविध विद्यापीठे,संस्था यामधले 657 विद्वान यामध्ये सहभागी झाले.
- केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीमुख्तार अब्बास नक्वी यांनी आज रामपूर (उत्तर प्रदेश) येथे सांगितले की“आत्मनिर्भरभारत” ही “एक भारत श्रेष्ठ भारत” ची हमी आहे.नक्वीयांनी रामपूर (उत्तर प्रदेश ) येथील नुमाईश मैदानावर आज “सांस्कृतिक सद्भावमंडपाची” पायाभरणी केली. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालय92 कोटी रुपये खर्चून “सांस्कृतिक सद्भावमंडप” बांधत आहे.या समाज केंद्राचा वापर विविध सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक उपक्रम,कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन,कोरोनासारख्या आपत्तीच्या वेळी मदतकार्य आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी केला जाईल.