अंडरवर्ल्डशी आमचे संबंध….; नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई ,९ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिले.

“दिवाळीनंतर फडणवीस फटाके फोडणार होते, मात्र त्यांचे फटाके फुसके निघाले. मी कोणत्याही अंडरवर्ल्ड किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीकडून प्रॉपर्टी घेतलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “दाऊद, अंडरवर्ल्ड अशी नावे घेऊन फडणवीस माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची धमकी देत आहेत. त्यांनी खुशाल चौकशी करावी, मी चौकशीसाठी तयार आहे,” असे आव्हान नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिले.