लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा निवासस्‍थानात राहणाऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे पुरावे सादर करण्याचे आवाहन

औरंगाबाद,९ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- शहरातील विश्वासनगर लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कर्मचारी/ कर्मचारी यांचे नातेवाईक यांनी आपण राहत असलेल्या निवासस्थानाच्या बाबतीचे आपले किंवा  आपल्या कर्मचारी नातेवाईकांचे कागदपत्रे पुरावे 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत: वैयक्तिकरित्या ​ सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे.