माजी नगरसेवक सुरेश इंगळे यांचे निधन

औरंगाबाद,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- रिपब्लिकन चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक सुरेश सांडू इंगळे (५८) यांचे सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शहाबाजार येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
दहा वर्षांपूर्वी ते स्वतः, बहीण शकुंतला इंगळे आणि त्यांचा वाहन चालक रामदास असे तिघे महापालिकेत निवडून आले होते.