नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही आरक्षण टाकू नये – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून या खोऱ्याअंतर्गत असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही आरक्षण टाकू नये अशी मागणी  आ.रमेश पाटील बोरणारे यांनी आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नांदूर-मधमेश्वर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली.

Displaying IMG-20211108-WA0125.jpg

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिंचन भवन कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस खा इम्तियाज जलील, आ.रमेश पाटील बोरणारे, आ.प्रशांत बंब,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,पाटबंधारे महामंडळाचे संचालक कुलकर्णी व अभियंता आदी उपस्थित होते.

या बैठकीत नांदूर-मधमेश्वर कालवा प्रकल्पांतर्गत असलेल्या भाम, भावली, मुकणे व वाकी या चारही धरणामध्ये 11 टीएमसी पाणी सिंचनासाठी आरक्षित असून औद्योगिकरण,पिण्याचेपाणी,बाष्पीभवन,वहानवे व आकस्मित पाणी अशा अनेक कारणासाठी 3.25 टीएमसी आरक्षित करून त्या पाण्याचे नियोजन करण्याचा प्रस्ताव नाशिक पाटबंधारे विभागाने  मांडला.या प्रस्तावास आ.बोरणारे यांनी विरोध करून वैजापूर -गंगापूर तालुक्यासाठी रब्बीचे दोन व उन्हाळी तीन असे एकूण पाच आवर्तन (1.5 टीएमसी) हक्काचे पाणी सोडण्याची तसेच वितरिकासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी आ.बोरणारे यांनी केली.
नांदूर-मधमेश्वर प्रकल्पांतर्गत असलेल्या भाम, भावली, मुकणे व वाकी या चारही धरणांचे नियंत्रण व व्यवस्थापन लाभक्षेत्र कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणीही आ. बोरणारे यांनी या बैठकीत केली.