दिवाळीचा मुहूर्त साधत म्हस्की येथील युवकांची”सेल्फी विथ खड्डा”मोहिमेला सुरुवात

वैजापूर ,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील म्हस्की व परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी  म्हस्की येथील युवकांनी दिवाळीचा मुहूर्त साधत रविवारी “सेल्फी विथ खड्डा” या मोहिमेला सुरुवात केली.

म्हस्की गाव व परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून,रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.खराब रस्त्यांमुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने म्हस्की येथील युवकांनी  रस्त्यात असलेल्या खड्डयांचे पूजन करून “सेल्फी विथ खड्डा” ही मोहीम सुरू केली.या मोहिमेत म्हस्की येथील युवक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश सावंत,पत्रकार शेख अझहर,इरफान सय्यद,चांगदेव वाबळे,सौरभ सावंत,अलताफ शहा, ऋषिकेश सावंत,बाळू सावंत,रमेश राशीनकर,विठ्ठल जाधव,अविनाश जाधव,अरमान शहा,मोहसीन शेख,मोबिन शेख,गजानन सोमवंशी,शाकिर शहा,शाहरुख सय्यद सहभागी झाले आहेत.