सुखना जलाशयात आढळला लाल मानेचा ससाणा

Displaying IMG-20211107-WA0009.jpg

सुखना परिसरात​​ ​41 वि​वि​ध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी

Displaying IMG-20211107-WA0012.jpg
Displaying IMG-20211107-WA0000.jpg

औरंगाबाद,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद जवळील सुखना मध्यम प्रकल्पात अतिशय दुर्मिळ  असलेला लाल मानेचा ससाणा (red-necked falcon red) या पक्ष्याचा दर्शन पक्षी मित्रांना रविवारी  झाले.

Displaying IMG-20211107-WA0017.jpg

निसर्ग मित्र मंडळ व पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी सप्ताह निमित्त कार्यक्रमात झाले.

Displaying IMG-20211107-WA0015.jpg


या विषयी अधिक माहिती सांगताना निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी म्हणाले की, लाल मानेचा ससाणा (शास्त्रीय नावः Falco peregrinus) हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोक्यावरच्या तसेच माणेवरच्यां लाल रंगावरून हा पक्षी ओळखता येतो.

Displaying IMG-20211107-WA0013.jpg


साधारणतः जोडीने शिकार करणाऱ्या या पक्ष्याचे दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर हे आहे .ससाणा आपल्या शिकारीचा आकाशातुन पाठलाग वेग सरासर २५० ते ३०० प्रती तास एवढा वेग संपादन करु शकतो.

Displaying IMG-20211107-WA0004.jpg
Displaying IMG-20211107-WA0007.jpg

या पक्षी अभ्यासात सुमारे 41 विवीध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी सुखना परिसरात या प्रसंगी पक्षी मित्रांनी घेतल्यानिसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने तर्फे ०५ नोव्हेंबर या मारूती चितमपल्ली यांचे जन्मदिनापासुन ते १२ नोव्हेंबर या  डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा आठवडा पक्षीसप्ताह साजरा केला  जात आहे. 

Displaying IMG-20211107-WA0003.jpg
Displaying IMG-20211107-WA0005.jpg

यावर्षी सुद्धा निसर्ग मित्र मंडळतसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुखना जलाशयात आयोजित पक्षी निरीक्षणात पक्षीमित्र किशोर गठडी, पक्षी मित्र केदार चौधरी, लालासाहेब चौधरी,महेंद्र देशमुख, आदी सहभागी झाले होते.

Displaying IMG-20211107-WA0001.jpg
Displaying IMG-20211107-WA0002.jpg

औरंगाबादहुन सुमारे २२  किमी अंतरावर असलेल्या सुखना मध्यम प्रकल्पात  निसर्ग मित्र मंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या या पक्षी निरीक्षणात प्रामुख्याने खालील पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

Displaying IMG-20211107-WA0006.jpg
Displaying IMG-20211107-WA0016.jpg

(red-necked falcon red) पांढऱ्या मानेचा ससाणा,चक्रवाक,चमचा (दर्विमुख),black Spot billed duck –  राखी बदक,Pintail duck – तलवार बदक,Green bea eater – वेडा राघू,Sea gull – कुरव पक्षी,White breasted waterhen – पांढरया छातीची पाणकोंबडी,

Displaying IMG-20211107-WA0019.jpg
Displaying IMG-20211107-WA0014.jpg

White breasted kingfisher – खंड्या,Wood shrike – काष्ठ खाटिक,Black drongo – कोतवाल,River tern – नदीसुरय,Grey heron –  राखी बगळा,Black winged kite – कापशी घार,Pied bushchat – गप्पीदास,Spotted dove – ठिपक्यांचा होला,Black winged stilt – शेकाट्या,Yellow wagtail – पिवळा धोबी,Painted stork – रंगीत करकोचा,Great Reed warbler – मोठा वटवट्या,धान तिरचिमणी, पांथळ चरचरी (PADDY-FIELD PIPIT)ऑस्प्रे 

Displaying IMG-20211107-WA0010.jpg
Displaying IMG-20211107-WA0008.jpg
Displaying IMG-20211107-WA0018.jpg