शिवसेनेने साजरी केली स्मशान जोगी परिवारासोबत भाऊबीज

औरंगाबाद,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- शिवसेनेच्या वतीने यावर्षी नावीन्यपूर्ण व अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात येत आहे. ध्वज दिवाळी अभियाना अंतर्गत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने महिला आघाडीच्या पुढाकाराने शहरातील स्मशान भूमीत जाऊन स्मशानजोगी व त्यांच्या परिवारासोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. 

Displaying IMG-20211107-WA0012.jpg

महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानजोगी बांधवांना भाऊबीजेच्या निमित्ताने ओवाळले तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराला परिवाराला मिठाई, फराळ, कपडे, भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. 

या निमित्ताने शिवसेना प्रवक्ते, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीनुसार शिवसेना सातत्याने विविध सामाजिक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. दीपावली निमित्त ध्वज दिवाळी अभियानाचाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकातील लोकांना देखील हा सण साजरा करता यावा, त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण घालवता यावे या हेतूने कोरोना काळात  दगावलेल्याना रक्ताचे नातेवाईक सुद्धा हात लावायला धजावत नव्हते , तेव्हा स्मशान जोगी आणि त्यांच्या कुटुंबाने जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराचे मोठे कार्य पार पाडले त्यांनी केलेले हे काम अत्यंत जोखमीचे होते पण जिवावर उदार होऊन या कुटुंबांनी हजारो कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले त्यांच्या या कामाची जाणीव व त्यांच्याबद्दल असलेल्या आदर यातून शिवसेनेच्या वतीने स्मशान जोगी व त्यांच्या परिवारास सोबत हा सण साजरा करण्यात येत आहे.

Displaying IMG-20211107-WA0010.jpg

आज महानगरपालिका क्षेत्रातील हर्सूल,पडेगाव,बनेवाडी , राहुलनगर, भीमनगर, भावसिंगपुरा ,कैलासनगर, शहाबाजार ,प्रताप नगर ,इंदिरा नगर प्रियदर्शनी नगर ,रमा नगर क्रांती चौक अशा एकूण 33 स्मशानभूमीमध्ये जाऊन भाऊबीज साजरी करण्यात स्मशान जोगी परिवारसोबत आली.

Displaying IMG-20211107-WA0011.jpg

याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा संघटक निता मंत्री, जयश्री लुंगारे, मीना फसाटे, दुर्गा भाटी, नलिनी बाहेती, शहर संघटक आशा दातार, प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, उपशहर संघटक कविता सुरळे, शोभा बडे, शोभा शिनगिरकर, किरण शर्मा, सुनिता सोनवणे, सुनीता अवताडे, सीमा गवळी, अंजना गवई, राजश्री पोफळे, भागुबाई शिरसाट, अरुणा भाटी, वनिता ठाकूर, जमना ठाकूर, जयश्री इंदापुरे, सुचीता आंबेकर, ज्योती काथार, देवयानी सीमंत आदींची उपस्थिती होती.