राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आपल्या प्राथमिक शाळेला भेट

मुंबई,६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्राथमिक विद्यालय चेताबगढ या शाळेला भेट दिली.

Image

राज्यपाल कोश्यारी यांचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. यावेळी राज्यपालांनी शाळेच्या ओसरीवर बसून गतस्मृतींना उजाळा दिला.  चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तालुक्यात आहे.

राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन

राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन

उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज जवळच असलेल्या प्रसिद्ध माँ भगवती मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तहसीलमध्ये आहे.

Image

पहाडी भागातून अतिशय दुर्गम वाटचाल करून या मंदिरात येताना राज्यपालांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.