उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा

बहिण-भावाचं अतूट नातं घट्ट करणारा भाऊबीज सण प्रत्येक घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन यावा

भाऊबीज सणाच्या निमित्तानं माता-भगिनींना समाजात हक्क, मान-सन्मान, आदर मिळावा – उपमुख्यमंत्री 

मुंबई ,५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजे निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री म्हणाले, “बहिण-भावाचं अतूट नातं अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना शुभेच्छा. यंदाची दिवाळी व भाऊबीज सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन घेईल. घरातलं, समाजातलं भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ करेल. यंदाचा भाऊबीजेचा सण, माता-भगीनींना समाजात त्यांचा न्याय्य हक्क, मान-सन्मान, आदर मिळवून देणारा व त्यासाठी लढण्याचं बळ देणारा ठरो. राज्यातील समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा….”