भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण आतापर्यंत 107.70 कोटीहून अधिक

  • देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.23%, मार्च 2020 पासून सर्वात उच्च स्तरावर
  • देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12,729 नवे दैनंदिन रुग्ण
  • देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 1,48,922
  • साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.25%) गेल्या 42 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

नवी दिल्ली ,५ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- देशात गेल्या 24 तासात 5,65,276 कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 107.70 कोटीपेक्षा अधिक (1,07,70,46,116) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,08,69,517 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 12,165 रुग्ण कोविड मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,37,24,959 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.23% झाला आहे.

सलग 131 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.गेल्या 24 तासात 12,729 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,48,922 इतकी असून , देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.43% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशात गेल्या 24 तासात 6,70,847 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.30 कोटीहून अधिक (61,30,17,614) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.25% असून गेले 42 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.90% असून गेले 32 दिवस 2% पेक्षा कमी आणि 67 दिवस 3% पेक्षा कमी आहे.