देशाच्या संरक्षण क्षेत्रातला महिलांचा सहभाग नवीन शिखर गाठत आहे-पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी जम्मू आणि कश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Image

ब्रिगेडियर उस्मान, नाईक जदुनाथ सिंग, लेफ्टनंट आर.आर.राणे आणि नौशेराच्या इतर वीरांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Image

नौशेरा (जम्मू -काश्मिर),४ नोव्हेंबर/प्रतिनिधी:-घटनात्मक पदावर असल्यापासून दरवर्षीप्रमाणेच, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या वर्षीही सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांना भेट दिली.

Image

दिवाळीत सशस्त्र दलांसोबत असणे, म्हणजे माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासारखेच आहे असे सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच घटनात्मक पद स्वीकारल्यानंतर आपला प्रत्येक दिवाळी सण सीमेवर सैन्यदलासोबत साजरा करत आहे असे त्यांनी सांगितले.

मी एकटा आलो नाही तर 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.  प्रत्येक भारतीय आज संध्याकाळी देशाच्या शूर सैनिकांसाठी शुभेच्छा देण्याकरता एक ‘दिवा’ लावेल असे ते म्हणाले. सैनिक देशाचे सुरक्षा कवच असल्याचे पंतप्रधानांनी सैनिकांना सांगितले. देशाच्या शूर सुपुत्रांनी देशाची सेवा करणे, हे भाग्यच आहे, जे प्रत्येकाला मिळत नाही, असेही ते म्हणाले.

Image

श्री मोदींनी नौशेरा इथून, देशवासियांना दिवाळी आणि गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ अशा आगामी सणांच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी गुजराती लोकांना त्यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

Image

नौशेराचा इतिहास भारताच्या शौर्याचा साक्षीदार आहे. सध्याचा काळ हा सैनिकांच्या शौर्याचे आणि दृढनिश्चयाचे मूर्त स्वरूप आहे. आक्रमक आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात हा प्रदेश ठामपणे उभा राहिला आहे असे ते म्हणाले. श्री मोदींनी नौशेराच्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ब्रिगेडीयर उस्मान आणि नाईक जदुनाथ सिंह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. शौर्य आणि देशभक्तीचा अभूतपूर्व आदर्श घालून देणाऱ्या लेफ्टनंट आर आर राणे आणि इतर शूरवीरांना त्यांनी सलाम केला. सशस्त्र दलांना अव्याहत मदत करणाऱ्या श्री बलदेव सिंह आणि श्री बसंत सिंह यांना नमन करुन  पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्जिकल स्ट्राईकमधे वठवलेल्या भूमिकेबद्दल तेथे तैनात असलेल्या ब्रिगेडचेही त्यांनी कौतुक केले. स्ट्राइक करून सर्व शूर सैनिक सुखरूप परतले तेव्हा दिलासा देणाऱ्या क्षणाची त्यांनी आठवण काढली.

Image

देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे आणि आजचा भारत स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्या क्षमता आणि संसाधनांबाबत सजग आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढत आहे. आधीसारखे आपण यासाठी परकीय देशांवर अगदीच अवलंबून नाही असे त्यांनी सांगितले. संरक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदीपैकी 65 टक्के निधी देशातच वापरला जात आहे. 200 उत्पादनांची एक सकारात्मक यादी तयार केली आहे. ही स्वदेशी असणारीच उत्पादने खरेदी केली जातील. लवकरच या यादीचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विजयादशमीला सुरू केलेल्या 7 नवीन संरक्षण कंपन्यांबद्दलही सांगितले. कारण जुने आयुध निर्माणी कारखाने आता विशेष क्षेत्रातील विशिष्ट उपकरणे आणि दारूगोळा बनवणार आहेत. संरक्षण कॉरिडॉर देखील येत आहेत. भारतातील तरुण संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अप्समध्ये उत्साहाने सहभागी होत  आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार अशी भारताची प्रतिमा अधिक सशक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image

बदलत्या गरजांनुसार भारतीय लष्करी शक्तीचा विस्तार आणि परिवर्तन करणे आवश्यक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने नवीन बदलांची मागणी केली आहे, म्हणूनच एकात्मिक लष्करी नेतृत्वामध्ये समन्वय सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. सैन्य दलांचे प्रमुख (सीडीएस) आणि लष्करी व्यवहार विभाग त्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याचप्रमाणे सीमेवरील आधुनिक  पायाभूत सुविधांमुळे देशाची लष्करी ताकद वाढेल, असे ते म्हणाले. लडाख ते अरुणाचल प्रदेश, जैसलमेर ते अंदमान निकोबार या सीमावर्ती भागात आधुनिक पायाभूत सुविधांसह संपर्क (कनेक्टिव्हिटी) स्थापित करण्यात आला आहे, यामुळे पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली असून सैनिकांसाठी सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

Image

देशाच्या संरक्षण दलातील महिलांचा सहभाग नवीन शिखर गाठत  असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. नौदल आणि हवाई दलात आघाडीवर तैनात झाल्यानंतर आता लष्करातही महिलांच्या भूमिकेचा विस्तार केला जात आहे. स्थायी कमिशन, राष्ट्रीय संरक्षण संस्था (एनडीए), राष्ट्रीय सैनिकी शाळा, राष्ट्रीय भारतीय सैनिकी महिला महाविद्यालय  उघडण्यासोबतच, पंतप्रधानांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनी मुलींसाठी सैनिक शाळा सुरू करण्याच्या घोषणेचा उल्लेख केला.

Image

सशस्त्र दलांमध्ये केवळ अमर्याद क्षमताच दिसत नाहीत तर अविचल सेवाभाव, दृढ निश्चय आणि अतुलनीय संवेदनशीलताही त्यांना दिसते असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारतीय सशस्त्र दल जगातील सशस्त्र दलांमध्ये अद्वितीय ठरते. भारतीय सशस्त्र दले जगातील सर्वोच्च सशस्त्र दलांइतकीच व्यावसायिक आहेत मात्र त्यांची मानवी मूल्ये त्यांना वेगळी आणि असामान्य बनवतात, असे पंतप्रधान म्हणाले. “तुमच्यासाठी, ही केवळ पगारासाठीची नोकरी नाही, तुमच्यासाठी ही एक साद आहे, पूजा आहे, तुम्ही 130 कोटी लोकांच्या भावनेचे वहन करता अशी एक पूजा आहे” पंतप्रधान म्हणाले. “साम्राज्ये येतात आणि जातात पण भारत हजारो वर्षांपूर्वी शाश्वत होता आणि आजही आहे आणि हजारो वर्षांनंतरही शाश्वत राहील. आम्ही राष्ट्राला सरकार, सत्ता किंवा साम्राज्य समजत नाही, आमच्यासाठी ते जिवंत आहे, वर्तमान आत्मा आहे, याचे रक्षण करणे हे केवळ भौगोलिक सीमांचे रक्षण करण्यापुरते मर्यादित नाही. आमच्यासाठी राष्ट्रीय संरक्षण म्हणजे या जिवंत राष्ट्रीय चैतन्याचे, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करणे आहे असे ते पुढे म्हणाले.

Image

“आपल्या सशस्त्र दलांना गगनाला भिडणारे शौर्य लाभले आहे, तर त्याचवेळी त्यांचे हृदय मानवी कारुण्याचा महासागर आहे, म्हणूनच आपले सशस्त्र दल केवळ सीमांचे रक्षणच करत नाहीत, तर आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असतात असे पंतप्रधान म्हणाले. तुम्ही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात दृढ विश्वास म्हणून वाढला आहे. तुम्ही भारताच्या एकता आणि अखंडतेचे आणि एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेचे संरक्षणर्ते आणि रक्षक आहात. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या शौर्याच्या प्रेरणेने आम्ही भारताला विकास आणि प्रगतीच्या शिखरावर नेऊ.”